Monday, October 15, 2018

जतमध्ये दीप्ती सावंत यांच्या पुढाकाराने नवरात्र महोत्सव

आजपासून तीन दिवस विविध कार्यक्रम
जत,(प्रतिनिधी)-
तनिष्का व अन्य सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सातत्याने महिलांच्या प्रश्नांवर काम करणार्या व त्यांच्या प्रगतीसाठी झटणार्या नगरसेविका सौ. दीप्ती सावंत यांच्या पुढाकाराने जत येथे आजपासून नवरात्र महोत्सव सुरू होत आहे. सलग तीन दिवस विविध कार्यक्रमांनी हा उत्सव सुरू राहणार आहे. महिलांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सौ. ज्योतीताई संजयकाका पाटील, सौ. उर्मिलाकाकी विलासराव जगताप उपस्थित राहणार आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून जत शहरात नगरसेवक उमेश सावंत व नगरसेविका सौ. दीप्ती सावंत यांच्या पुढाकारने नवरात्र काळात महिलांसाठी नवरात्र महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यावर्षी सलग तीन दिवस विविध उपक्रमांनी उत्सव साजरा केला जात आहे. या कार्यक्रमासाठी खासदार संजयकाका पाटील यांच्या पत्नी सौ. ज्योतीताई पाटील व आमदार विलासराव जगताप यांच्या पत्नी सौ. उर्मिलाकाकी जगताप उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सौ. छायाताई ताड, डॉ. रेणुका आरळी, नगरसेविका सौ. श्रीदेवी सगरे, सौ. जयश्री शिंदे, सौ. स्वप्नाली ताड, नगरसेविका कु. जयश्रीताई मोटे, सौ. स्वाती हिरवे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आज मंगळवार दि. 16 रोजी सायंकाळी पाच वाजता या महोत्सवाला सुरुवात होणार आहे. येथील शिवानुभव मंडप येथे येथे हा महोत्सव सोहळा रंगणार आहे. यात प्रामुख्याने रास दांडिया, खेळ, फनी गेम्स, ग्रुप दांडिया होणार आहे. जतचे नवोदित गायक प्रकाश कोळी यांचा संगीत रजनी हा कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आला आहे.   

No comments:

Post a Comment