Saturday, October 20, 2018

कोंतेबोबलाद येथील खंडणी मागणी व दहशत माजवणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

 जत,(प्रतिनिधी)-
कोंतेबोबलाद गावात शेजारील गावातील गुंड येऊन दहशत माजवत खंडणी गोळा करत असून यामुळे गावातील दुकानदार, नागरिक भयभयीत  झाले  आहेत. उमदी पोलिसांनी  अशा गाव गुंडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी कॉंग्रेसचे विक्रमसिंह सावंत आणि कॉंग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार यांनी उमदी  पोलिस ठाण्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

कोंतेबोबलाद जत तालुक्यातील पूर्व  भागातील  कर्नाटकाच्या सीमावर्ती भागात आहे. हे गाव  जत  विधानसभेचे विद्यमान आमदार विलासराव जगताप यांचे मूळ गाव आहे.या  गावात अनेक वर्षांपासून आमदार जगताप यांच्या दहशती खाली एकतर्फी सत्ता होती. त्यांच्या दहशती मुळे गावात लोकशाही पद्धतीने निवडणूक होत नव्हती. परंतु नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या लोकशाही पद्धतीने झालेल्या निवडणुकीत  आमदार जगताप यांच्या  पॅनेलचा  प्रचंड मताने पराभव झाला आणि काँग्रेस प्रणीत लोकनियुक्त सरपंच पुंडलीक बसाप्पा कांबळे हे मागासप्रवर्गातून  निवडून आले. त्याचबरोबर एकूण सदस्य 11 संख्येंपैकी 7 सदस्य काँग्रेस पक्षाचे  निवडून आले आहेत. या सत्ता परिवर्तनामुळे  झालेला त्यांच्या गटाचा पराभव आमदार जगताप यांच्या चांगलाच  जिव्हारी लागला  आहे.त्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. या कारणास्तव ते शेजारील करेवाडी (को.बो.)येथील स्थानिक गुंडांकरवी खंडणी मागणे आणि दहशत निर्माण करणे असा प्रकार सुरू आहे. प्रत्येक दुकानदारावर या प्रकारामुळे भयभयीत  झाला आहे. या घडलेल्या प्रकाराबाबत उमदी पोलीस स्टेशन यांच्याकडे  तक्रारी अर्ज दाखल केला आहे.त्या आरोपींना पाठबळ विद्यमान आमदारांचा आहे. या गुंडांवर  कारवाई  करताना स्थानिक पोलीस स्टेशनवर दबाव येणाची शक्यता आहे, या पुढे या प्रकाराबद्दल कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यास शासकीय यंत्रणा जवाबदार राहील,  अशा प्रकारचे निवेदन  उमदी  पोलीस  ठाण्याकडे देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment