Monday, October 22, 2018

मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या कार्याध्यक्षपदी दिलीप हिंदुस्थानी यांची निवड

जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या सांगली जिल्हा कार्याध्यक्षपदी बिरादारवस्ती (करजगी ता.जत)  दिलीप हिंदुस्थानी यांची निवड करण्यात आली आहे.
सांगली जिल्हा मागासवर्गीय  शिक्षक संघटनेची कार्यकारणी  बैठक नुकतीच संघटनेची बैठक जत येथे खेळीमेळीत  पार पडली. यावेळी निवडीचे पत्र पुणे विभागीय सचिव प्रल्हाद हुवाळे यांनी श्री .हिंदुस्तानी यांना  दिले.
यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष काटे, शिक्षक नेते तुकाराम नाईक,तालुकाध्यक्ष सुनील सूर्यवंशी, संदीप पाथरवट उपस्थित होते.
या निवडीबद्दल जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप हिंदुस्थानी म्हणाले की,गेल्या 20 वर्षांपासून आपण फुले-शाहू-आंबेडकर विचार धारा बहुजन शिक्षकांत रुजविण्याचे काम करीत आहोत.सर्व प्रवर्गातील शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार करत आहे. तसेच आमची संघटना 1926 च्या श्रमिक कामगार अधिनियमअंतर्गत नोंदणी कृत्य असून शिक्षकांच्या अन्यायाविरोधात लढा उभा करू असे सांगितले.

No comments:

Post a Comment