Saturday, October 20, 2018

बीएलओंवर पोलिस कारवाई केल्याने खळबळ


सांगली येथील पाच बीएलओंवर कारवाई
 जत,(प्रतिनिधी)-
 मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्य- क्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात बोलविलेल्या बैठकीत गोंधळ घालून व्यत्यय आणणार्या पाच मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांना शनिवारी पोलीस कारवाई सामोरे जावे लागले. यापुढेही मतदार नोंदणीचे काम करताना कर्तव्यात कसूर करणार्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 353 नुसार तसेच निवडणूक कायद्यांतील विविध कलमांतर्गत सक्त कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी या नात्याने जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी स्पष्ट केले आहे. सांगली येथे ही कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्यातील बीएलओम्मध्ये खळबळ उडाली आहे. बीएलओ म्हणून शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी काम करीत आहेत.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी प्रदीप शेलार यांनी मतदार नोंदणीबाबत सांगली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि पर्यवेक्षक यांची बैठक बोलावली होती. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनाज मुल्ला उपस्थित होते. या बैठकीत काही मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांनी गोंधळ घालून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी काही अधिकार्यांना चर्चेसाठी बोलावले. परंतु संबधित कर्मचार्यांचे असहकार्य आणि नकारात्मक भूमिका कायम राहिल्याने जिल्हाधिकार्यांनी निवडणूक कायद्याप्रमाणे कारवाई करण्यासाठी पोलिसांना जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्याबाबत पोलीस अधीक्षक यांना आदेश दिला. कारवाई होणार असल्याचे समजताच संबधितांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून, त्यांना पोलीस कारवाई न करण्याबाबत विनंती केली. परंतु त्यांची विनंती जिल्हाधिकार्यांनी फेटाळली. पोलीसांनी या संबधित पाच जणांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई सुरु केली. कारवाईला सामोरे जावे लागलेल्यांमध्ये संतोषकुमार दत्तू कोळी, नामदेव साहेबराव तुपे, संजू पांडुरंग चौगुले, श्रीमती सीमा सुहास पाटील आणि जयश्री कृष्णाजी गायकवाड आदींचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment