Friday, October 19, 2018

संख येथील खूनप्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी


जत,(प्रतिनिधी)-
संख (ता. जत) येथील सिद्धगोंडा पराप्पा बिरादार (वय 25) यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी भरमाण्णा बिराप्पा करजगी (रा. संख, वय 26) याला 22 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. भरमाण्णा बिराप्पा करजगी यांच्या पत्नी सोबत सिद्धगोंडा बिराजदार यांचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून कुर्हाडीने वार खून केल्याचा कबुली दिली होती. खून करण्यासाठी वापरलेली कुर्हाड 700 फूट खोल असणार्या कूपनलिकेत टाकली आहे. न्यायाधीश वाघमारे यांच्यासमोर सुनावणी झाली. वस्तू व पुढील तपास करण्यासाठी चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

No comments:

Post a Comment