Monday, October 15, 2018

आजच्या सुपरफास्ट बातम्या


मंगळवार दि. 16 ऑक्टोबर 2018
सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील 9 हॉस्पिटल्सना दणका
सांगली- शासकीय महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थींकडून ज्यादाची रक्कम उकळणार्या खासगी हॉस्पिटलवर सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील पाच, तर कोल्हापूर जिल्ह्यातील चार खासगी हॉस्पिटल्सना या योजनेतून वगळण्यात आले आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही हॉस्पिटल्सची चौकशी सुरू असून चौकशीची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत संबंधित हॉस्पिटल्सना तात्पुरत्या कालावधीकरिता वगळण्यात आले आहे.

अंकलीत सराईत गुन्हेगारांकडून तोडफोड
सांगली-मिरज तालुक्यातील अंकलीत सराईत गुन्हेगाराच्या यादीवरील स्वप्नील ऊर्फ गोट्या प्रकाश कोलप आणि त्याच्या साथीदारांनी जातिवाचक उल्लेख करत त्यांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देत हल्ला केला. संबंधितांनी त्या ठिकाणी उभ्या असलेल्या गाडीची तोडफोड करून त्यावर दगड घातले. या प्रकरणी राहुल अनिल पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.

बुरुड गल्लीत तरुणावर खुनीहल्ला
 सांगली- शहरातील बुरुड गल्लीत सराईत गुन्हेगार पवन धर्मेंद्र साळुंखे आणि त्याच्या दोन साथीदारांनी रविवारी मध्यरात्री एका तरुणावर खुनी हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी योगेश शामराव नागे (वय 30) या तरुणाने शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीस उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगली-‘भारत माता की जयऽऽऽ...’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जयऽऽऽ...’ अशा जयघोषात आणि राष्ट्रप्रेमाने भारलेली गीतांच्या निनादातशिवप्रतिष्ठानची दुर्गामाता दौड सोमवारी सहाव्या दिवशी लक्षवेधी ठरली. शहरातील प्रमुख मार्गावर महिला-भगिनींनी सडा-रांगोळ्या घालून दुर्गामाता दौडीचे स्वागत केले. ‘शिवप्रतिष्ठानच्यावतीने परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात बुधवारी पहाटे घटस्थापनेच्या दिवशी दुर्गामाता दौडीला सुरुवात झाली. काल सहाव्या दिवशी शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या दौडीत हजारो तरुण सहभागी झाले होते.

व्यापार्यांच्या बंदमुळे तीन कोटींची उलाढाल ठप्प
सांगली- अन्यायकारक सेवाकराची नोटीस मागे घेण्याच्या मागणीसाठी सोमवारी व्यापार्यांनी बंद पुकारला होता. बंदमुळे दिवसभर यार्डातील व्यापारीपेठ बंद राहिली; परिणामी अडीच ते तीन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती.

आरेवाडीच्या दोन दसरा मेळाव्यांची उत्सुकता
सांगली- धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर मंगळवारी आरेवाडीतील बिरोबा देवस्थानच्या परिसरात होणार्या दोन वेगवेगळ्या मेळाव्यांबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. युवा नेते गोपीचंद पडळकर यांच्या निमंत्रणाला प्रतिसाद गुजरातमधील पाटीदार आरक्षणाचे नेते हार्दिक पटेल सांगलीकडे रवाना झाले आहेत; तर माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनीजय मल्हारमालिकेचा नायक देवदत्त नागे यांना निमंत्रित करुन विविध स्पर्धांच्या माध्यमातून मेळाव्याला आकार देण्याची जोरदार तयारी केली आहे. शेंडगेंच्या नेतृत्वाखालील मेळावा एक आणि पडळकरांच्या अधिपत्याखालील मेळावा दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे. समाज मात्र कोणाच्या मेळाव्याला जायचे, अशा द्विधा मनःस्थितीत असल्याचे चित्र आहे.

महांकालीदेवीचा नवरात्रोत्सव सुरू
कवठेमहांकाळ- येथील शहरासह तालुक्याचे जागृत देवस्थान महांकालीदेवीच्या नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने प्रारंभ झाला. शहरातील मध्यभागी असलेले महांकाली मंदिर आकर्षक रोषणाई; तसेच मंडपाने फुलून गेले. नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महांकालीदेवीची पौरोणिक कथा आज सांगितली जाते.

सांगलीत वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा
सांगली-सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनच्यावतीने सोमवारी वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर संगीता खोत उपस्थित होत्या.No comments:

Post a Comment