Wednesday, October 10, 2018

मूळ प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांकडेच राहणार


नवी दिल्ली : महाविद्यालयांना आता कोणत्याही विद्यार्थ्याचे मूळ प्रमाणपत्र स्वत:कडे ठेवून घेता येणार नाही. एवढेच नाही तर विद्यार्थ्याने जर महाविद्यालय बदलण्याचा निर्णय घेतला तर त्याला त्याने भरलेली शुल्काची रक्कमही परत करावी लागणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली असून, यासाठी विद्यापीठ अनुदान मंडळाकडून मार्गदर्शक तत्त्वे देखील जाहीर केली आहेत.
जावडेकर म्हणाले, महाविद्यालये विद्याथ्यार्ंंकडून त्यांची स्वत:ची स्वाक्षरी असलेली प्रमाणपत्र घेतील, मूळ प्रमाणपत्रासोबत त्याची पडताळणी केली जाऊ शकते. प्रमाणपत्रांसह कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर विद्यार्थ्यास त्याचे मूळ प्रमाणपत्र परत केले जाईल. प्रवेश मिळाल्यानंतर स्थलांतर प्रमाणपत्रास महाविद्यालय स्वत:कडे ठेवेल. यासर्व बाबींबद्दल अनेक तक्रारी आल्याने हा निर्णय घेण्यात आला. जर विद्यार्थी महाविद्यालयातील प्रवेश रद्द करुन दुसर्या ठिकाणी प्रवेश घेऊ इच्छित असेल, तर त्याला त्याने भरलेले सर्व शुल्क परत मिळेल. प्रवेशप्रक्रिया बंद होण्याच्या 16 दिवस अगोदर कोणताही प्रवेश रद्द झाला तर संपूर्ण प्रवेश शुल्काची रक्कम परत मिळेल. तर प्रवेशाच्या अंतिम तारखेच्या 15 दिवस अगोदर प्रवेश रद्द करण्यात आला तर 90 टक्के शुल्क परत मिळेल. प्रवेश झाल्यानंतर एक महिन्याच्या आत जर प्रवेश रद्द करण्यात आला तर 50 टक्के रक्कम परत मिळेल. जर या सूचनांचे पालन झाले नाही तर महाविद्यालय किंवा संस्थेवर दंड आकारला जाईल.

No comments:

Post a Comment