Monday, October 22, 2018

उटगी शाळेतील प्रोजेक्ट गायब; कारवाईची मागणी


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील उटगी येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेतील प्रोजेक्टवर गायब झाला आहे. त्याचा त्वरित शोध घेऊन संबंधित शिक्षकावर कारवाई करावी. प्रोजेक्टवरचा त्वरित तपास न झाल्यास शाळेला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य संजय माळकोटगी यांनी गटशिक्षणाधिकार्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
 उटगी येथे जिल्हा परिषद कन्नड शाळा गावात आहे. येथे सहा महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेकडून कन्नड शाळेसाठी प्रोजेक्टर मिळाला होता. मुलांना डिजिटल शिक्षण मिळावे व मुलांची गुणवत्ता वाढावी म्हणून हा प्रोजेक्टर दिला होता. मात्र ते प्रोजेक्टर शाळेतून गायब झाले आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रोजेक्टरविषयी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे प्रोजेक्टर कोणी गायब केला? त्यांच्यावर कारवाई व्हावी; अन्यथा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा माळकोटगी यांनी दिला.

No comments:

Post a Comment