Tuesday, October 9, 2018

तिकोंडी अतिक्रमणप्रकरणी उपोषण सोडले

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील तिकोंडी येथील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेले उपोषण आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी सोडलेकाँग्रेसचे नेते व जिल्हा परिषद सदस्यसांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते सरबत पिऊन उपोषण सोडण्यात आले.
तिकोडी येथील अतिक्रमण काढण्यात यावे व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावीया मागणीसाठी रायप्पा राचगोंड,बसंगौडा पाटीलरंमगोंडा पाटीलगुड़ु मुल्ला,सुरेश कट्टीमनी,ईश्वर हदिमनी,काशीराम माळी,सदाशिव पाटील यांनी तिकोडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होतेसंबंधित अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याचे आश्वासन पंचायत समतितीचे विस्तार अधिकारी श्रीजाधव यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर काँग्रेस नेते जिल्हा परिषद सदस्य जि..बँकेचे संचालक विक्रमसिंह (दादासावंत यांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण सोडण्यात आलेया वेळी माजी पं स.सदस्य पिराप्पा माळीजलिंद्र व्हनमाने,जत तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष विकास माने,करेवाडी सरपंच हिंदूराव शेंडगे,बसवराज पाटील,अमर माने,मिथुन मानेव ग्रामसेवकग्रा..सदस्य व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment