Thursday, October 4, 2018

बोर्गीच्या 'सहारा ग्रुप'चा सहकारमंत्र्यांकडून गौरव

सामाजिक कार्यात अग्रेसर;दुष्काळ निवारण्यासाठी प्रयत्न
जत,(प्रतिनिधी)-
'पाणी आडवा,पाणी जिरवा',वृक्षारोपण,रक्तदान,मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजन, उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव असे विधायक कार्य करणाऱ्या बोर्गी (ता.जत) येथील सहारा कला क्रीडा  सांस्कृतिक मंडळ  तथा 'सहारा ग्रुप' चा गौरव खुद्द सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला. ग्रुपने सामाजिक कार्यात उंच भरारी घ्यावी, सदिच्छाही दिली.
या संस्थेला जतच्या लायन्स क्लबने विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन ग्रामीण भागातील "आदर्श संस्था " म्हणून गौरविण्यात आले.
  सहारा ग्रुप या संस्था जत तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला आणि क्रीडा आदी क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत आहे. या कार्याची दखल घेऊन  लायन्स व लाईनेस क्लब जतचे संस्थापक सदस्य डॉ रवींद्र आरळी यांच्याकडून सन २०१८साठी ग्रामीण भागातील 'आदर्श संस्था' या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.  या मंडळाने समाजामध्ये सहभागी होत विविध समाजोपयोगी कामे करून सामाजापुढे चांगला आदर्श  ठेवला आहे. गेल्या चार वर्षांपासून मंडळाचे कार्यकर्ते अनेक विधायक काम हाती घेत आहेत आणि तडीस नेत आहेत.मंडळाने केलेल्या सामाजिक कार्य पाहून याहीपुर्वी  अनेक संघटनेने या मंडळाचा तालुकास्तरीय व  जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन  सन्मानित   केले आहे. मंडळातील सर्वच सदस्य, कार्यकर्ते क्रियाशील आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक जाणीवेतून काम करतात,
 या सहारा तरुण मंडळाने सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात जनजागृतीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सतत चालू ठेवले  आहे.                        
      सामाजिक, शैक्षणिक  क्षेत्रात उल्लेखनीय कामे केली आहेत. महाराष्ट्र शासन व पाणी फाउंडेशन कडून राबवलेल्या वाटर कप स्पर्धेत  सक्रिय सहभाग घेत तालुक्यातील कुलाळवाडी, मायथळ,सनमडी आदी ठिकाणी जलसंधारणाची कामे केली. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज ओळखून दरवर्षी या मंडळ वृक्षारोपणाचे काम केले आहे. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करून गोळा झालेल्या रकमेतून गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी वाचनालय चालवले जाते. याचा  फायदा अनेक विद्यार्थ्यांना होत आहे. स्वच्छ भारत सुंदर भारत हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून व  दरवर्षी स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. दरवर्षी मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येऊन गरजू व गरीब रुग्णांना मोफत औषधउपचार उपलब्ध करून देण्याचा  प्रयत्न चालू आहे.'पाणी आडवा पाणी जिरवा' या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेऊन लोकांना जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले जाते. सप्टेंबर महिन्यांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 28 शिक्षकांना 'सहारा आदर्श शिक्षक' पुरस्कार दिला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार केला. या कार्याची दखल घेत लायन्स क्लबने  नुकतेच जत येथे 'आदर्श तरुण मंडळ' पुरस्कार  देऊन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा  गौरव केला.
सहारा मंडळाचे अध्यक्ष दावल पुळुजकर, उपाध्यक्ष मौलाली सातभाई यांच्या नेतृत्वाखाली आणि मलकारी होनमोरे, आर जी बिरादार, लखन होनमोरे, गांधी चौगुले, लकप्पा शिरगट्टी,  यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची सामाजिक कार्यातील घोडदौड सुरू आहे.

No comments:

Post a Comment