Wednesday, October 3, 2018

धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही -गोपीचंद पडळकर

जत,(प्रतिनिधी)-
 धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही आणि आरेवाडीचा मेळावा हा  होणारच. त्यामुळे मेळावाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन गोपीचंद पडोळकर यांनी  जत येथे कार्यकर्त्याँच्या मेळाव्यात बोलताना केले.
जत येथील बचत भवन येथे झालेल्या कार्यकर्त्याँच्या मेळाव्यात श्री. पडोळकर बोलत होते.आरेवाडी येथील बिरोबाच्या बनातील दसरा मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा  देणारा आहे  असे सांगत गोपीचंद पडळकर ज्या कार्यक्रमाची घोषणा करतो तो कार्यक्रम होतच असतो .या मेळाव्यासाठी पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना आमंत्रित केले आहे. ते पंधरा ऑक्टोबरला सांगलीत येणार आहेत.भाजपाने सत्ता आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते.पण आता चार वर्षे पूर्ण झाली तरी आरक्षणासंदर्भात एकही बैठक झाली नाही. या शासनाने केवळ दिशाभूल करण्याचा उद्योग सुरू केला आहे.
मराठा, मुस्लिम,लिंगायत समाज या सर्वांची दिशाभूल केली असून आरक्षण मिळाल्याशिवाय हा गोपीचंद पडळकर स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणाले.भाजपाचा एक पदाधिकारी कार्यालयात बसून हा मेळावा रद्द झाल्याचे सोशल मीडियावर अफवा पसरवत आहे. याला मी भीक घालणार नसून आरक्षण मिळण्यासाठी माझा हा लढा चालूच राहणार असल्याचे ते म्हणाले. माझ्यावर मोका कायदा लावण्यासाठी जोरदार हालचाली असून मी काही गुंड मवाली आहे का असा सवाल विरोधकाना नाव न घेता उपस्थित केला.
      यावेळी उद्योगपती दादासाहेब पांढरे,लक्ष्मण जाखगोंड , माजी  सभापती आकाराम मासाळ, जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, भाऊसाहेब दुधाळ, आटपाडी पंचायत समितीचे उपसभापती तानाजी यमगर,  अनिल पाटील,तम्मा कुलाळ, श्रीशैल पाटील, सागर मलगुंडे, चिक्कू माळी,  ,अँड. सागर व्हनमाने,भाऊसाहेब लोखंडे, आदीजन उपस्थित होते.
 या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात काँग्रेस व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
(जत येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गोपीचंद पडळकर व व्यासपीठावर दादासाहेब पांढरे,लक्ष्मण जखगोंड,आकाराम मासाळ,महादेव  पाटील)

2 comments: