Wednesday, October 10, 2018

खलाटी येथे महिलेस गजाने मारहाण


जत,(प्रतिनीधी)-
जत तालुक्यातील खलाटी येथे जमिनीच्या वादावरून सदाशिव व्हनमाने (रा. खलाटी) याने महादेवी रामण्णा प्रधाने (वय 45 रा. खलाटी) या महिलेस लोखंडी गजाने मांडीवर मारहाण केली. तसेच माणिक दादू हाक्के यांनी महादेवी प्रधाने यांचा मुलगा योगेश यांस कुर्हाडीच्या दांड्याने डोक्यावर व पाठीवर मारहाण केली आहे. ही घटना मंगळवारी खलाटी येथे घडली याबाबतची फिर्याद महादेवी प्रधाने या महिलेने जत पोलिसांत दिली आहे.या घटनेची पोलिसांत नोंद असून अधिक तपास हवालदार शंकर पवार करीत आहेत.

No comments:

Post a Comment