Tuesday, October 16, 2018

येळवी येथे कोल्हाचा विहिरीत पडून मृत्यू

 
जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यातील  येळवी येथे  पाण्याचे  दुर्भिक्ष असल्याने पाण्याच्या शोधार्थ भटकणाऱ्या कोल्हाचा धोंडीराम खंडा कुलाळ  यांच्या ४०फूट खोल विहिरीत पडून  मृत्यू झाला.  हा मादी जातीचा  कोल्हा असल्याचे वनसंरक्षक हणमंत वगरे यांनी सांगितले . वनविभागाने जीव वाचविण्याचा प्रयत्न केला.परंतु तो विहिरीतून वर काढले असता मयत झालेला आढळून आला. दुष्काळी जत तालूक्यात  अद्याप  पुरेशा पाऊस झाला नाही. यामुळे पशूजन्य जीवन धोक्यात आले आहे. मृत्यू झालेल्या कोल्हाच्या  पंचनामा वनविभागाने  केला. यावेळी ,वनक्षेत्रपाल हरिबा मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली  वनसंरक्षक हणमंत वगरे ,सुनिल जिपटे ,सचिन वगरे ,सचिन ओलेकर यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी ,ग्रामस्थ  उपस्थित होते. 
  पाण्याअभावी  दुर्मिळ जंगली जीवांचे मात्र अतोनात हाल सुरु आहेत .पोटात भडकलेली भूक आणि तहान शमविण्याकरिता अन्नपाण्याच्या शोधार्थ वणवण भटकंती करणाऱ्या निष्पाप जंगली जीवांचा असा करुन अंत मनाला चटका लावणारा ठरला आहे.अशा दुर्मिळ जीवांचे जतन करण्याकरिता पाणी व्यवस्था  शासनाने करणे  गरजेचे आहे.चार महिन्यांपूर्वी काराजनगी (ता.जत) येथे ही शेततळ्यात नाग जोडी अडकली होती.परंतु  वनविभागास या नागजोडीस वाचविण्यात यश आले.तदनंतर खैराव ता.जत येथेही काळविट विहिरीत पडून मृत्यू झाला होता .

No comments:

Post a Comment