Friday, October 12, 2018

संख ग्रामपंचायतीवर बिनबुडाचे आरोप:मंगल धर्मा-पाटील

जत,(प्रतिनिधी)-
 संख ( ता.जत ) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम प्रगती पथावर असून ग्रामपंचायत काम पूर्ण करून घेण्यासाठी सक्षम आहे. जि.प.सदस्य रेखा बागेळी या संख गावात रहात नाहीत . जत शहरात राहून स्वार्थासाठी पाणीपुरवठा योजना कामावर बिनबुडाचे आरोप करून संख ग्रामपंचायतीला बदनाम करत आहेत.असा आरोप   सरपंच मंगल पाटील - धर्मा  यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली .
           सन  १९७२ मधील पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्यानंतर सन २०११ मध्ये नव्यानेच संख गावासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेसाठी ६८ लाख रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे . भिवर्गी ( ता.जत ) साठवण तलावातून पाणी उचलून  संख गावात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, असे सांगून मंगल पाटील पुढे म्हणाल्या की , १० लाख रुपये संख ग्रामपंचायत खात्यावर जमा असून ६८ लाख रुपये जि.प.कडून येणे बाकी आहे. कामाची गुणवत्ता तपासणी झाली असून खर्चाचे लेखापरीक्षणही झाले आहे. या कामात कोणताही अपहार अथवा गैरव्यवहार झालेला नाही. बागेळी या भाजपच्या जि.प.सदस्य असून त्या नवख्या आहेत .त्यामुळे माहिती नसताना बिनबुडाचे आरोप त्यांच्याकडून होत आहेत. यासंदर्भात आमदार विलासराव जगताप यांची भेट घेवून आम्ही तक्रार करणार आहे,असे त्यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment