Monday, October 22, 2018

सांगली जिल्हा सुपरफास्ट बातम्या


मंगळवार दि. 23 ऑक्टोबर 2018
वारणालीत हायप्रोफाईल वेश्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा
सांगली-पोलिसांनी विश्रामबाग मधील वारणालीत एका बंगल्यावर छापा घालून त्या ठिकाणी हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे सोमवारी उघडकीस आणले. पहिल्या गल्लीत राजबाग या नावाच्या बंगल्यात हा धंदा सुरु होता. त्या ठिकाणी कुंटणखाना चालविणारी महिला सराईत असून अशाच प्रकारचा गुन्हा केल्याप्रकरणी यापूर्वी तिच्यावर चार गुन्हे दाखल असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक दिलीप टिपरसे यांनी दिली.
माव्याची उधारी मागितल्याने दगडाने हल्ला
 सांगली-माव्याची उधारी मागितल्याने एकाने दगड मारून पानपट्टी चालकाचे कपाळ फोडल्याची घटना शहरातील आंबेडकर रोडवर घडली आहे. रविवारी दुपारी हा प्रकार घडला. शहर पोलिसांनी संशयीत अशोक दारासिंग कांबळे (शांतिनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न करणार्या पतीला सात वर्षे सक्तमजुरी
सांगली-चारित्र्याच्या संशयावरून पेटवून देऊन पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी दीपक नारायण देवकारे याला कोर्टाने सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सोमवारी सुनावली. मूळचा शिरोळ येथील राहणार्या या आरोपीने सांगलीनजीक कुपवाड मध्ये राहत असताना पत्नीला पेटवून दिले होते. या खटल्याचा न क  ा ल अ ि त ि र क्त  जिल्हा व सत्र न्यायाधीश प े र म प ल्ल ी यांनी दिला. स र क  ा र ी वकील म्हणून अॅड. अनिल कुलकर्णी यांनी काम पाहिले.
संविधानाच्या लढ्यासाठी एकत्र या : मेधा पाटकर
इस्लामपूर-संविधानाचा अवमान हा लोकशाहीचा अवमान आहे. त्याच्या सन्मानासाठी प्रत्येकाने लढा उभारण्याची गरज आहे. आपल्या अस्तित्वाला धोक्यात आणणार्या सत्तेविरुद्ध आणि जाती-धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या राजकारणाला आव्हान देण्यासाठी संविधानाच्या लढ्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन नर्मदा बचाव आंदोलनाच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले.
विष प्राशन केल्यानेच माळीचा मृत्यू : सुहेल शर्मा
सांगली- कवठेमहांकाळ तालुक्यातील बसाप्पावाडी येथील श्रीकांत माळी याने पोलिसांना तपासाच्यावेळी सहकार्य केले होते. त्यामुळे त्याला मारहाण करण्याचा प्रश्नच येत नाही. पैशाची मागणी करण्याचे कारण नाही. त्या गावच्या सरपंचानेच पंप चोरीचे प्रकरण गाव पातळीवर मिटविण्यात येईल, असे सांगून माळीला पोलिस ठाण्यातून नेले आहे. त्यानंतर सुमारे अठरा तासांनी माळीचा मृत्यू झाला आहे. शवविच्छेदनानंतर विष प्राशन केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
पूर्ववैमनस्यातून मिरजेत हाणामारी
 मिरज-येथील माधव टॉकीज जवळ खडीवाले बिल्डींगमध्ये राहणारे इम्तीयाज अब्दुलमुजीव खडीवाले (वय 32) व नदीम नबीसाब तारळेकर (वय 24 रा. भंडारीबाबादर्गा) यांच्यामध्ये पूर्वीच्या भांडणाचा राग मनात एकमेकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. खडीवाले व तारळेकर यांनी एकमेकांविरोधात मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.इम्तीयाज अब्दुलमुजीव खडीवाले व नबीसाब तारळेकर यांच्यामध्ये काही दिवासापूर्वी वादा झाला होता. यामध्ये नबीसाब तारळेकर यांनी खडीवाले यांच्या डोक्यात कोयता मारून जखमी केले. त्यामुळे दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
सहकार मंत्री सुभाष देशमुख पुन्हा अडचणीत
मुंबई-सहकार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप. सो. लि. सोलापूर या संस्थेने बनावट कागदपत्रे जोडून केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत दूध भुकटी प्रकल्पासाठी 24.81 कोटी अनुदान मंजूर करून घेतले असून, त्यातील 5 करोड या संस्थेला मिळाले असल्याचा गंभीर आरोप करताना, याची संपूर्ण चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सोमवारी केली. ही चौकशी निःपक्षपातीपणे व्हावी यासाठी सुभाष देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
चोरीला गेलेला ऐवज फिर्यादींकडे सुपूद
सांगली- ज्यांचा ऐवज चोरीला जातो, त्यांची हुरहूर काय असते, याची जाणीव ठेवून पोलिसांनी संबंधित चोरट्यांकडून हस्तगत केलेला ऐवज अगदी जाहिरपणे संबंधितांच्या हाती पुन्हा सुपूर्द केला. चोरी, घरफोडीसारखे गुन्हे उघडकीस आणून विश्रामबाग पोलिसांनी सोमवारी चार लाख नव्वद हजार रुपयांचा ऐवज 15 फिर्यादींच्या हाती ठेवला.

No comments:

Post a Comment