Monday, October 22, 2018

पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा


जत,(प्रतिनिधी)-
 मुंबई येथील बांद्रा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उदय रामचंद्र काळे (मूळ गाव सरूड, ता. शाहूवाडी) यांनी लग्नाचे आमिष दाखवून 25 वर्षीय युवतीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी सांगली जिल्ह्यातल्या शिराळा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  
 याबाबत समजलेली माहिती अशी की, ही युवती कोकरूड येथे महाविद्यालयात शिकत आहे. तिची ओळख 20 जून 2016 रोजी उदय याच्याशी झाली. नंतर उदयने, ‘तू स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कर, मी तुला नोट्स देईन,’ असे सांगितले. 29 ऑगस्ट 2016 रोजी तिच्याशीच लग्न करणार असल्याचे त्याने युवतीस सांगितले. तो मित्र-मैत्रिणींनाही लग्न करणार असल्याचे सांगत होता. या नंतर 15 नोव्हेंबर 2016 रोजी या युवतीचा वाढदिवस होता.
यावेळी ते दोघे वाढदिवस साजरा करण्यासाठी मोटारसायकलवरून (एमएच 09, 9501) शिराळा येथील हॉटेलमध्ये आले. वाढदिवस साजरा केला. त्यानंतर आपणलग्न करणार आहोत, असे म्हणून युवतीच्या विरोधाला डावलून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर वारंवार याच हॉटेलमध्ये लग्नाच्या आमिषाने बलात्कार केला. यानंतर सप्टेंबर 2017 पासून तिच्याशी लग्न करणार नसल्याचे सांगून बोलणे व फोन घेणे बंद केले. याबाबत या युवतीने शाहूवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र ही घटना शिराळा येथे घडल्याने शिराळा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे करत आहेत.

No comments:

Post a Comment