Monday, October 1, 2018

राजे रामराव महाविद्यालयात स्वच्छता व श्रमदान

जत,(प्रतिनिधी )-
जत येथील राजे रामराव महाविद्यालयात महात्मा गांधी यांची १५० वी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची ११४ वी जयंती स्वच्छता व श्रमदानाने साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एस.ढेकळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
          यावेळी बोलताना प्राचार्य    डॉ. ढेकळे  म्हणाले कि, अहिंसा व सत्य या तत्वाची देणगी महात्मा गांधी यांनी जगाला दिली. आज युवकांना महात्मा गांधीजींच्या विचारांची गरज आहे.  महात्मा गांधीजींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्वाचा पुरस्कार केला आणि जगालाही सत्य आणि अहिंसेची देणगी दिली.
लालबहाद्दूर शास्त्री हे एक संयमी व्यक्तिमत्व व साधे जीवन जगणारे होते. लालबहाद्दूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा देऊन सैनिकांचे व शेतकऱ्यांचे महत्व पटवून दिले. आज राष्ट्राला महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या विचारांची गरज आहे असेही प्राचार्य शेवटी  म्हणाले.
महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती निमित्त  राजे रामराव महाविद्यालयामध्ये एन.सी.सी. व विद्यार्थी- विद्यार्थिनीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे गट पडून महाविद्यालयाच्या 23 एकर परिसराची स्वच्छता करण्यात आली. प्रारंभी प्रा. आर.बी. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कुमार इंगळे यांनी तर शेवटी आभार प्रदर्शन प्रा  डॉ. सोमनाथ काळे यांनी केले. यावेळी प्रा. पी ए. सावंत, प्रा. सी.वाय.माने पाटील , प्रा. आर डी .कारंडे, प्रा. के.एम. धनगोंड व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

No comments:

Post a Comment