Friday, October 19, 2018

विद्यार्थिनींना मोफत एसटी प्रवास


जत,(प्रतिनिधी)-
शासनाच्या आहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजनेअंतर्गत आता ग्रामीण भागातील इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थीनींना महाविद्यालयात जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसने मोफत प्रवास करता येणार आहे. दूर अंतरावर शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थीनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारने 1196 पासून अहिल्यादेवी होळकर मुलींना मोफत प्रवास योजनेअंतर्गत पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थीनींना मोफत एसटी बस प्रवास करण्याची सवलत दिली आहे. या प्रवासी सवलत याजेनेत सुधारणा करण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला आहे. त्यानुसार आता 5 वी ते 12 वीपर्यंत शिक्षण घेणार्या विद्यार्थीनींना ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेची कार्यवाही करून पुर्तता अहवाल सादर करण्याच्या सुचना एसटी महामंहामंडळाचे महाव्यवस्थापकांनी राज्यातील सर्व आगार प्रमुखांना दिल्या आहेत. बस स्थानकावर दर्शनीय ठिकाणी ही माहिती प्रसिद्ध करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment