Wednesday, October 17, 2018

सुधारणा नको; जुनी पेन्शनच हवी


सचिवांसमोर जुनी पेन्शन हक्क संघटनेची भूमिका
जत,(प्रतिनिधी)-
 डीसीपीएस अथवा एनपीएस मध्ये सुधारणा नको; जुनी पेन्शनच हवी, अशी ठोस भूमिका जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकार्यांनी मुख्य वित्त सचिव श्री. मदान यांच्यासमोर मांडली. दरम्यान जुनी पेन्शन लढा कुटुंबीयांसह अधिक व्यापक करण्याचा संकल्प संघटनेच्यावतीने करण्यात आल्याची माहिती संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी बोलताना श्री. शिंदे म्हणाले, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या 2 3 ऑक्टोबर च्या पेन्शन दिंडीच्या पार्श्वभूमी वर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मुख्य वित्त सचिव यांच्यासोबत जुनी पेन्शन बाबत संघटनेची बैठक 16 ऑक्टोबरला झाली. श्री. मदान यांच्या दालनात ही झालेल्या बैठकीस करण्यास अप्पर सचिव गदरे, उपसचिव अनुपम दिघे; तसेच पेन्शन हक्क संघटनचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पेन्शन हक्क संघटनकडून राज्यात 1 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत आलेल्या कर्मचार्यांना लागू करण्यात आलेल्या अंशदान पेन्शन योजनेमुळे कर्मचार्यांचे भविष्य असुरक्षित बनले आहे.
 गेल्या 13 वर्षात अंशदान पेन्शन योजना राबवण्यात अपयश आले आहे. नव्याने सेवेत आलेल्या सर्वच कर्मचार्याच्या दृष्टीने पेन्शन हा चिंतेचा विषय बनला असून सर्वच कर्मचार्याना 1982 ची जुनी पेन्शन योजनाच लागू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. संघटनच्या शिष्टमंडळाकडून एक आराखडा दिला जाणार आहे. त्यानुसार जुनी पेन्शन योजनाच कर्मचारी हिताची असल्याने तिचा स्वीकार करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली. जुनी पेन्शन मिळवण्याचा लढा हा व्यापक व दीर्घकालीन असून ही झालेली बैठक ही औपचारिकता आहे. शांततामय मार्गाने 2 ऑक्टोबरला निघणार्या पेन्शन दिंडीस ऐनवेळी परवानगी नाकारल्याने राज्यातील युवा कर्मचारी वर्गात असंतोष आहे. त्यामुळे नुसती चर्चा करत न थांबता 1 नोव्हेंबर 2005 नंतरचे जास्तीत जास्त कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांनी एकत्र येत आंदोलनाच्या म ाध्यमातून सरकार व राज्यकर्त्यांवर दबाव वाढवण्यासाठी चळवळ अधिक व्यापक करत 100 टक्के कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय लढ्यात सक्रिय करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी दिली.

No comments:

Post a Comment