Tuesday, October 9, 2018

येळवी जि. प.शाळेत पालक सभा संपन्न

गोवर व रुबेला लसीकरनाबाबत माहिती
जत,(प्रतिनिधी)-
    येळवी (ता.जत) येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत गोवर-रूबेला लसीकरणासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी पालक सभा घेण्यात आली. यावेळी  येळवीचे उपसरपंच सुनील अंकलगी यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतेमेचे पूजन करून सभेला सुरवात करण्यात आली.
सभे मध्ये गोवर व रुबेला या रोगा बद्दल माहिती ट्रेनर श्री. कोळी यांनी दिली. राज्यात सर्वत्र ही लस 27 नोव्हेंबर ला शासनाकडून देण्यात येणार आहे. ही लस 9 महिन्यापासून ते 15 वर्षा पर्यंतच्या सर्व बालकांना,मुलांना देण्यात येत असून या लसीमुळे भविष्यात होणाऱ्या आजारावर मात करण्यासाठी सर्वानी गांभीर्याने लक्ष घालावे,असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक भारत क्षीरसागर यांनी केले. या वेळी  तुकाराम सुतार,दीपक अंकलगी,महादेव जाधव,संतोष स्वामी,संगोलकर,पांडुरंग गुदळे,संतोष चव्हाण,भाऊसो खरात,मधुकर आवटे व पालक उपस्थित होते.  आभार सुनीता हिले यांनी मानले.

No comments:

Post a Comment