Tuesday, October 23, 2018

कोंतेबोबलादच्या घटनेशी माझा संबंध नाही:आमदार जगताप

जत, (प्रतिनिधी)-
 कोंत्येवबोबलाद ( ता.जत ) येथील घटनेशी माझा कोणताही सबंध नाही .तालुक्यात कांहीजरी झालेतरी माझ्या नावावर खापर फोडले जात आहे . काँग्रेस पक्षाची  तालुक्यात नामुष्की झाली आहे . त्यात भर घालण्याचे काम पक्षाचे तालुका अध्यक्ष आप्पू बिराजदार करत आहेत . त्यामुळे आम्हाला पोषक वातावरण तयार होत आहे .अशी माहिती आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली .
   जनसुराज्य पक्षाचे अँड. आडव्याप्पा घेरडे , वसंतदादा विकास आघाडीचे शिवाजी शिंदे यांच्यासह जत पंचायत समिती मधील भाजपचे पक्षीय बलाबल ११ इतके  झाले आहे .  वसंतदादा विकास आघाडीसोबत आम्ही पाच वर्षे बांधील राहाणार आहे . शिवाजी शिंदे यानी उपसभापती पदाचा राजीनामा दिल्यानंतर अँड. आडव्याप्पा घेरडे याना त्या पदाची संधी देण्यात येणार आहे . त्यामध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही .असे सांगून आमदार विलासराव जगताप पुढे म्हणाले की , काँग्रेसचे नेते विक्रम सावंत यानी एका पंचायत समिती सदस्याला पाच लाख रुपये देण्याचे अमिश दाखवून  सदस्य फोडण्याचा प्रयत्न केला आहे .त्यांचा तो प्रयत्न आम्ही यशस्वी होवू दिला नाही . म्हणून त्यांची नैतिक पातळी ढासळत चालली आहे.जनता व कार्यकर्ते पैशाला भूलून काम करणार नाहीत यावर आमचा विश्वास आहे .
         तालुका नेते विक्रम सावंत यांची मर्जी सांभाळण्यासाठी व सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी आप्पू बिराजदार पत्रकबाजी करत आहेत . प्रांताधिकारी व प्रसिध्दीसाठी वेगवेगळे निवेदन देवून बिराजदार सर्वाची फसवणूक करत आहेत . बाजार समिती विश्रामगृह व कार्यालयाला त्यांनी दारुचा आड्डा बनविले आहे. प्रथम स्वताचे आत्मपरीक्षण करावे त्यानंतर बिराजदार यानी इतरावर आरोप करावेत असेही आमदार विलासराव जगताप यानी यावेळी सांगितले .

No comments:

Post a Comment