Saturday, October 20, 2018

काशिलिंगवाडीत अनोळखी तरुणाचा मृत्तदेह सापडला

जत, (प्रतिनिधी)-
  जत तालुक्यातील    काशिलिंगवाडी  येथे लक्ष्मण जवळकर यांच्या  विहिरीत अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह  पाण्यावर तरगंत असल्याचे आढळून आले.ही घटना शनिवारी पाच वाजणेच्या सुमारास निदर्शनास आली.  सदरच्या अनोळखी व्यक्तीचे अंदाजे वयवर्षे 25ते 30च्या  दरम्यान असून .मृत्तदेहावर  बरमुडा  व टीशर्ट  आहे.
अद्याप ही मयत व्यक्तीस कोणी ओळखू शकले नाही. ही माहिती पोलिस पाटील लक्ष्मण  बाळू   हिप्परकर यांनी जत पोलिसात दिली आहे.  रात्री उशिरापर्यंत जत पोलिसांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने हा अनोळखी मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. ही घटना जत पोलिसात नोंद असून अधिक तपास पोलिस  करीत आहेत .दरम्यान जतमधील कोणी बेपत्ता आहे का याचा उशिरा तपास पोलिसांकडून सुरू होता.

No comments:

Post a Comment