Friday, October 19, 2018

प्रथम सत्र प्रश्‍नपत्रिका निर्मितीचे काम शिक्षकांच्या माथी


जत,(प्रतिनिधी)-
शालेय शिक्षण विभागाकडून सत्र परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका देण्यात येतात. मात्र आता राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने ही जबाबदारी झटकून प्रश्नपत्रिका निर्मितीचे काम शिक्षकांच्याच माथी मारले असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी झालेल्या शिक्षण समितीच्या मासिक सभेत शिक्षणाधिकार्यांनी याबाबतची माहिती सभागृहाला दिली. शुक्रवारी शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची मासिक बैठक झाली.
शाळेमध्ये संकलित चाचणी सत्र एकची परीक्षा दिवाळीच्या सुटीपूर्वी घेतली जाते. यासाठी शिक्षण विभागाकडून प्रश्नपत्रिका राज्यस्तरावरून पुरवठा केल्या जातात; मात्र यंदा अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्नपत्रिका शिक्षकांनीच तयार करून दिवाळीपूर्वी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये संकलित मूल्यमापन एक, चाचणीच्या प्रश्नपत्रिका व शिक्षक सूचनापत्र यांचा राज्यस्तरावरून पाठपुरावा होणार नसल्याची माहिती शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी दिली. महाराष्ट्र शासनाकडून पुढील महिन्यात राबविण्यात येणार्या गोअर-रूबेला लसीकरण मोहिमेसाठी सर्व शाळांमध्ये प्रशिक्षण पूर्ण झालेले असून हे शिबीर प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना सभापती पाटील यांनी दिल्या. 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून कडेगाव तालुक्यातील अमरापूर केंद्रा अंतर्गत सर्व शाळा कडेगाव समाविष्ट करून कडेगाव ही केंद्र शाळा करण्याच्या निर्णय घेण्यात आला.
यावेळी सदस्य शरद लाड, सुरेंद्र वाळवेकर, ॅड. शांता कनुंजे, सुलभा अदाटे, शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी महेश चोथे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment