Sunday, October 7, 2018

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षण गरजेचे:दादासाहेब मोरे

जत,(प्रतिनिधी)-
 निव्वळ पदवीसाठी शिक्षण न घेता आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मुक्त विद्यापिठाचे शिक्षण  घ्यावे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही,असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाचे विभागीय संचालक  तसेच 'गबाळ' कार प्रा. दादासाहेब मोरे यांनी यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या  संख येथील पदवीदान समारंभप्रसंगी बोलताना केले.
संख येथील गुरुबसव विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजच्यावतीने मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र चालवले जाते. यानिमित्ताने पदवीदान समारंभ प आयोजित केला होता. यावेळी मान्यवऱ्यांच्या हस्ते पदवीधर विद्यार्थ्यांना  प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.  यावेळी विभागीय संचालक  प्रा. मोरे यांनी गुरुबसव विध्यामंदिराने राबवत असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक करून पुढे म्हणाले की ,  जास्त शिक्षण घेतलेला माणूस आज स्वतःच्या फायद्यात गुंतला आहे . यामुळे शहरी भागातील माणुसकी कमी होताना दिसत आहे . पण खेड्यात आजही एखादा नवखा माणूस दिसला की त्याची आपूलकीने चौकशी करून माहिती दिली जाते. हीच आपली परंपरा आहे. अशा ग्रामीण भागात अभ्यास केंद्र चालवले जाते,ही चांगली गोष्ट आहे.
 जतचे उपविभागीय कृषी अधिकारी कांताप्पा खोत  यावेळी बोलताना म्हणाले कि , आपले ध्येय निश्चित असेल तर आपण नक्की यश मिळवू शकतो आणि  यासाठी कोणत्या भाषेत शिक्षण घेतले आहे याची कसलीही अडचण येणार नाही  जतचे  सहकार उपनिबंधक अप्पासाहेब यशवंत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले . अध्यक्षीय भाषण करताना प्रा. आर.बी. पाटील यांनी समाजातील मुलामुलींचा भेदभाव कमी होण्यापेक्षा वाढत आहे. ही मानसिकता कुठे तरी बदलायला पाहिजे. आई वडिलांची ही भूमिका  बदलल्यास भविष्यात चांगले दिवस येतील. यावेळी  सहारा ग्रुप (बोर्गी ) ला लायन्स क्लब 'आदर्श संस्था'पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त  आर. जी. बिरादार, मलकारी होनमोरे, महानंदा बिरादार,एम. एम. मुल्ला, बालाजी पडलवार, शोभा खैराव,चंद्रशेखर कारकल यांच्यासह सेवानिवृत्त प्राध्यापक व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रवीणकुमार वठारे यांनी केले तर आभार प्रा.एम.जे.रानघर यांनी मानले.यावेळी संस्थेचे संचालक गुरु पाटील, प्राचार्या ज्योती पाटील, किरण पाटील,  सौ.के. के. पाटील,आर. बी.पाटील, जी. आर. पाटील, सुरेखा पाटील ,उपसरपंच काशीबाई टोणे , भास्कर कोळी ,विशाल वालिकर आदी  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment