Monday, October 22, 2018

विकास प्राथमिक शिक्षक संस्थेची विटा येथे शाखा


 जत,(प्रतिनिधी)-
 सांगली जिल्हा विकास प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या विटा शाखेस मान्यता मिळाली असून रविवार, दि. 28 ऑक्टोबर रोजी ही शाखा सभासदांच्या सेवेस दाखल होत आहे, अशी माहिती संस्थेच्या पार्लमेंटरी बोर्डाचे माजी, शिक्षक नेते अध्यक्ष गजानन पाटील यांनी दिली. खानापूर व कडेगाव तालुक्यातील शिक्षकांसाठी उपयोगी ठरणार आहे. पलूस व शिराळा येथेही लवकरच शाखा सुरू करण्याचा मानस संस्थेचे अध्यक्ष व संचालकांचा असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment