Sunday, October 21, 2018

भाजपाच्या जत तालुका कार्याध्यक्षपदी सुनील पवार


जत,(प्रतिनिधी)-
भारतीय जनता पार्टीच्या जत तालुका कार्याध्यक्षपदी जत पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय पाटील यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार विलासराव जगताप,महावितरणच्या नूतन संचालिका नीता केळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सम्ग्रामसिंह देशमुख, शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रविपाटील, डॉ. रवींद्र आरळी, ॅड. श्रीपाद अष्टेकर, उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. पवार म्हणाले, पक्षवाढीसाठी आपण प्रयत्नशील असून पुन्हा एकदा जिल्ह्यात लोकसभा,विधानसभेला भाजपाच झेंडा फडकणार आहे. यासाठी आम्ही कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करू.
सुनील पवार यांची निवड झाल्याचे पत्र मिळाल्यानंतर त्यांना पंचायत समितीचे सभापती शिवाजी शिंदे, जि.. सदस्य सरदार पाटील, स्नेहलता जाधव, रेखा बागेली, सुशिला तावंशी, श्रीदेवी जावीर, रामण्णा जीवन्नावर, विष्णू चव्हाण, नगरसेवक उमेश सावंत,विजय ताड, भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडोडगी, शहराध्यक्ष अण्णा भिसे, ममता तेली, अप्पासाहेब नामद, शिवाप्पा तावंशी, लक्ष्मण बोराडे, माणिक पाटील, शंकर वगरे, प्रमोद सावंत, अरविंद गडदे, तम्मा सगरे, प्रकाश माने, अशोक पाटील, संजय तेली आदींनी श्री. पवार यांना शुभेच्छा दिल्या.No comments:

Post a Comment