Saturday, October 6, 2018

बाबरवस्ती (पांडोझरी) जि.प. शाळा एफएम येरळावाणीवर

जत,(प्रतिनिधी)-
 एफएम 91.2 येरळावाणी रेडीओ (सांगली)ने शालेय पोषण आहार व शाळेतील उपक्रमांबद्दल बाबरवस्ती (पांडोझरी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा माहीती व जनजागृती कार्यक्रम घेतला.  मुलाखतवजा असलेला हा कार्यक्रम गुरुवारी 11 ऑक्टोबर रोजी सकाळी सात ते साडेआठ दरम्यान प्रसारित करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बाबरवस्ती (पांडोझरी) ता.जत.जिल्हा सांगली येथे प्रथमच मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता, विविध उपक्रम व ज्ञानरचनावाद या विषयी माहिती जाणून घेतली व सर्व विद्यार्थी माता पालक  व ग्रामस्थ  यांच्या शी शाळेच्या  गुणवत्ते विषयी व शालेय पोषण आहार विषयी माहीती घेतली व शालेय पोषण आहार व स्वच्छेते विषयी मार्गदर्शन केले.
एफएम 91.2 येराळावाणी "चला विकासाचं बोलु" सांगली रेडीओने मुलाखत घेतली आहे.
उदय गोडबोले, सानिका खरे,क्षितिजा केळकर या मुलाखतकारांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांची मुलाखत घेत 11 ;रोजी सकाळी 7 ते 8पॉया वेळेत
विद्यार्थी, माता पालक,आणि शिक्षक  याची
मुलाखत प्रसारित होणार आहे.
व 7 ऑक्टोबर आणि 14 ऑक्टोबर 2018 रोजी संध्याकाळी साडेसहा ते आठ या वेळेत प्रसारित केली जाणार आहे. संध्याकाळचा कार्यक्रम फक्त मुलांचा असणार आहे.
 श्रोतु वर्गानी या बाबरवस्ती  शाळेतील नाविण्यपूर्ण उपक्रम व विद्यार्थी गप्पा व पालकांशी चर्चा   प्रसारित होणार  आहे,तरी  याचा लाभ घ्यावा .असे  आवाहन शाळेचे शिक्षक दिलीप वाघमारे यांनी केले.

No comments:

Post a Comment