Monday, October 15, 2018

दसरा, दिवाळीसाठी जतचे गोब्बी ट्रॅक्टर्स सज्ज

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्याच्या शेती, शिक्षण आणि उद्योग-व्यवसाय क्षेत्रात प्रभावशाली आणि विश्‍वासार्हता जपून काम करणार्‍या गोब्बी उद्योग समुहाच्या गोब्बी ट्रॅक्टर्समध्ये दसरा आणि दिवाळीसाठी खास ऑफर्स सुरू करण्यात आल्या आहेत. शेतकर्‍यांचा सोबती बनून काम करणारे गोब्बी ट्रॅक्टर्सचे मालक सुभाष गोब्बी यांचे गोब्बी ट्रॅक्टर्स आणि टीव्हीएस शोरुम अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंदीस उतरले आहे. दसरा, दिवाळीसाठी अनेक मॉडल्स आणि काही ऑफर्स यावर्षी देण्यात येत असल्याची माहिती श्री. गोब्बी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
शेतकर्‍यांच्या समस्या, अडचणी जवळून अनुभवल्या असल्या कारणाने श्री. गोब्बी यांनी दोनच वर्षांपूर्वी गोब्बी ट्रॅक्टर्स या नव्या व्यवसायाची उभारणी केली. फोर्स कंपनीचे अधिकृत डीलरशिप त्यांच्याकडे आहे. दोन वर्षात पश्‍चिम महाराष्ट्रात उत्तम सोयी-सुविधा आणि ग्राहकांचा विश्‍वास या जोरावर त्यांनी आतापर्यंत एक हजाराहून अधिक ट्रॅक्टर्सची विक्री केली आहे.
आज दुष्काळी पट्ट्यातही शेतीची सर्वच कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जात आहेत. या भागात फोर्स कंपनीच्या ट्रॅक्टर्सला अधिक पसंदी दिली जाते. शेतकर्‍यांना कशाची आवश्यकता अधिक आहे, याचा अभ्यास करून त्यांनी ट्रॅक्टर्स विक्रीच्या क्षेत्रात पाऊल टाकले आणि सचोटी,प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच आपला व्यवसाय नावारुपास आणला. सध्या गोब्बी ट्रॅक्टर्सकडे नवे-जुने मिळून जवळपास एक हजाराहून अधिक ट्रॅक्टर्सचे ग्राहक आहेत. शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांनी आपली सेव अपुरवण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी जतमध्ये अद्ययावत शोरूम उघडण्यात आले आहे. इथे स्मार्ट कर्मचारी, आधुनिक वर्कशॉप उपलब्ध आहे.
ग्राहकांना बँक,फायनान्स, विमा संरक्षण, सर्व प्रकारची शेती औजारे माफक दरात उपलब्ध करून दिले जातात.  दरम्यान, दसरा आणि दिवाळीसाठी पंचवीस एचपी ते पन्नास एचपीपर्यंतची फोर्सची सर्व प्रकारची मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये बलवान व ऑर्चीडचे 330,400,450.500 आणि 550 व त्याचबरोबर नव्याने दाखल झालेले फोर्स कंपनीचे अत्याधुनिक तंत्रज्ञानायुक्त मॉडेल्स उपलब्ध आहेत. यंदा सणाला ट्रॅक्टर्स खरेदी करणार्‍या ग्राहकाला रोहीत कंपनीचे पेरणी यंत्र किंवा अन्य काही औजारे मोफत देण्यात येणार आहेत. तसेच आरटीओ पासींग, विमा व तात्काळ कर्जाची सुविधा उपलब्ध आहे.
फोर्स ही एक भारतातील ट्रॅक्टर्स सेवेतील एक कंपनी आहे. मर्सिडीज तंत्रज्ञान इंजीन, डिस्क ब्रेक, पॉवर स्टेअरिंग, उत्तम मायलेज आणि उच्च गुणवत्ता आणि शक्तिशाली ही या गाडीची वैशिष्ट्ये आहेत. ऊस वाहतूक, माती,दगड आदी कामांसाठी शेतकर्‍यांनी नेहमीच या ट्रॅक्टरला पसंती देत आहेत. दसरा-दिवाळी शेतकर्‍यांनी फोर्सच्या ट्रॅक्टर्ससोबत घालवायचे ठरवले आहे. शेतकर्‍यांच्या सेवेसाठी आपण तत्पर तयार असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment