Thursday, October 11, 2018

मेश्राम, आटपाडकर, जगताप यांचे शैक्षणिक साहित्य स्पर्धेत यश


जत,(प्रतिनिधी)
जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने प्राथमिक शिक्षकांसाठी नुकत्याच तालुकास्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बहुशिक्षकी शाळा गटात विलास मेश्राम (जिरग्याळ) तर द्विशिक्षकी शाळा गटात राजू आटपाडकर (चव्हाणवस्ती, डफळापूर) यांच्या शैक्षणिक साहित्यास  प्रथम क्रमांक मिळाला.
जत येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा क्र.1 च्या सभागृहात या शैक्षणिक साहित्य निर्मितीच्या स्पर्धा पार पाडल्या. बहुशिक्षकी गटात द्वितीय क्रमांक पल्लवी भालशंकर (शाळा क्र.1,जत) तर तृतीय क्रमांक चंद्रशेखर याळगी (कोंतेबोबलाद) यांच्या शैक्षणिक साहित्यास मिळाला. द्विशिक्षक गटात द्वितीय क्रमांक पूनम होलमुखे (कडीमळा,जत) तर तृतीय क्रमांक आण्णाप्पा हत्तुरे (कोनबगी) यांनी पटकावला. यावेळी तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत मारुती जगताप (करेवाडी),राजू आटपाडकर (चव्हाणवस्ती,डफळापूर) आणि विलास मेश्राम (जिरग्याळ) यांच्या शैक्षणिक साहित्यास अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळाले.या सर्वांचे अभिनंदन होत आहे.
या शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून केंद्रप्रमुख एन.व्ही.चौरे, जत हायस्कूलचे कलाशिक्षक सुभाष शिंदे आणि बाल विद्यामंदिरचे शिक्षक महादेव निंब्याळ यांनी काम पाहिले. यावेळी गटशिक्षणाधिकारी बी.एन.जगधने, विस्तार अधिकारी आर.डी.शिंदे आणि तानाजी गवारे यांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेटी दिल्या आणि शिक्षकांच्या कलागुणांचे कौतुक केले. स्पर्धेचे नेटके नियोजन केंद्रप्रमुख संभाजी कोडग यांनी केले. पहिल्या तीन स्पर्धकांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
(शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेच्यावेळी परीक्षकांना आपल्या शैक्षणिक साहित्याची ओळख करून देताना शिक्षिका पल्लवी भालशंकर)

3 comments: