Tuesday, October 23, 2018

शिक्षक भारती संघटनेकडून अभिजित राऊत यांचा सत्कार


जत,(प्रतिनिधी)-
 यशवंत पंचायतराज सन 2017-18 या अभियानामध्ये सांगली जिल्हा परिषदेचा राज्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांचा सांगलीत शिक्षक भारतीच्या जिल्हा संघटनेकडून सत्कार करण्यात आला.
 यावेळी महेश शरनाथे म्हणाले, सांगली जिल्हा परिषदेत रूजू झाल्यापासून उत्कृष्ट काम केले आहे. स्वच्छ भारत मिशनमध्ये देशात सांगली जिल्ह्याने मिळविलेल्या यशा- बरोबरच यशवंत पंचायतराज सन 2017-18 मध्ये सांगली जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून मानाचे स्थान मिळविले आहे. भेटीसाठी येणार्या प्रत्येकाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे, तासगाव तालुक्यातील एका आजोबांना स्वच्छतागृह बांधण्यासाठी स्वतः शोषखड्डा काढत कर्मचार्यांना प्रोत्साहन देणे, अत्यावश्यक वेळी उपचारासाठी वेळोवेळी मदत करणे यासह शिक्षकांचेही प्रलंबित प्रश्न सोडवण्यात आघाडी घेतली आहे. एक नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षकांच्या अंशदान कपात, विषय शिक्षक 4300 ग्रेडपे वेतनश्रेणी, मुख्याध्यापक, विषयशिक्षक पदोन्नती, पहिल्या व तिसर्या शनिवारी शिक्षण परिषद घेऊ नये, शाळा बांधकामातील एम. बी. मंजुरीचा प्रश्, वरिष्ठ वेतनश्रेणी हे प्रश्न सोडवण्याची मागणी केली.
यावेळी शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे, फैसल पटेल, सुधाकर माने, सुधाकर वसगडे, कृष्णा पोळ, दिगंबर सावंत, संजय कवठेकर, जमीर मणेर,रतन कुंभार, यमगर, पाटील हे शिक्षक भारतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment