Tuesday, October 16, 2018

धनगर समाजाचा हक्क डावलणार्‍यांना उलथवून टाका


अण्णा डांगे यांचे आवाहन

जत,(प्रतिनिधी)-
धनगर समाजाचा आरक्षणाचा हक्क डावलणार्या राज्य सरकारला उलथवून टाकू आणि उद्यापासूनच महाराष्ट्रातील मंत्र्यांचे कार्यक्रम हाणून पाडू; तसेच मंत्र्यांना राज्यातून फिरू देणार नाही, अशी घोषणा माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केली. धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर समाजाच्या आंदोलनात सर्व शक्तीनिशी उतरू, असा इशारा भाजपचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी दिला.
 आरेवाडीच्या बनात झालेल्या दसरा मेळाव्यात डांगे, शेंडगे, महात्मे बोलत होते. या दसरा मेळाव्यात राज्य सरकारवर सर्वच वक्त्यांनी कडाडून हल्ला केला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. देवेंद्र फडणवीस यांनी पहिली थाप निवडणुकीच्या प्रचारात मारली होती. त्यानंतर सतत चार वर्षे ते थापा मारून धनगर समाजाची दिशाभूल करत होते. आणि आता त्यांनी विश्वास घात केला आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांना राज्याच्या सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी केली. धनगर समाजाला आरक्षण देतो, असे झुलवत ठेवून वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले. त्यामुळे या पुढच्या काळात आणि उद्यापासूनच मंत्रिमंडळातील कुठल्याही मंत्र्यांचे कार्यक्रम समाजाने हाणून पाडावेत, असे आवाहन डांगे यांनी केले.
 धनगर समाजाला आरक्षण देतो, असे फसवून सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारने समाजाच्या डोळ्यात धूळफेककेली आहे. त्यामुळे हे सरकार मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. धनगर समाजाने या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी रस्त्यावर उतरावे आणि या सरकारलाचले जावम्हणून हाकलावे, असा इशारा माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिला. धनगर आरक्षणासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची (टीस) धनगर समाजाने मागणी केली नव्हती. मात्र सरकारनेटीसचे भूत आमच्या मानगुटीवर बसवले आणिटीसच्या अहवालात धनगर समाजाला आरक्षण देण्याची गरज नसल्याचे नमूद केल्याचे समजते. त्यामुळे सरकार आपल्याला आरक्षण देणार नाही. म्हणून हे सरकार धनगर समाजाने उलथवून टाकावे, अशी हाक प्रकाश शेंडगे यांनी दिली. शेजारी झालेल्या दसरा मेळाव्यासाठी कोणी मदत केली, त्या झारीतील शुक्राचार्याचे नाव समोर येईल. परंतु धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समाजाच्या साथीने अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहू, अशी ग्वाही प्रकाश शेंडगे यांनी दिली.
भाजप सरकारने धनगर समाजासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. परंतु आरक्षण जाहीर न केल्याने समाजामध्ये असंतोष आहे. त्यामुळे या पुढच्या काळात आरक्षणासाठी समाज जो पुढची दिशा ठरवेल, त्या आंदोलनात मी अग्रभागी असेन. मला पक्षापेक्षा जातीचा अभिमान आहे, अशी जाहीर भूमिका भाजपचे खासदार विकास महात्मे यांनी घेतली. ‘जय मल्हारया गाजलेल्या मालिकेतील खंडेरायाची भूमीका करणारे अभिनेते देवदत्त नागे यांनी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या पाठीशी धनगर समाजाने उभे राहावे, असे आवाहन केले. राज्यातील कोळी समाज हा धनगर समाजाच्या खांद्याला खांदा लावून आरक्षणासाठी रस्त्यावर उतरेल आणि या सरकारला सळो की पळो करून सोडेल, असा इशारा कोळी समाजाचे नेते शरद कोळी यांनी दिला. दुसर्या मेळाव्यात हार्दिक पटेलला आणून केवळ गर्दी खेचली आहे. ज्या हार्दिकला गुजरातमध्ये पटेल समाजाला आरक्षण मिळवण्यात अपयश आले, तो धनगर समाजसाठी काय करेल, असा सवाल विविध वक्त्यांनी केला.
जयसिंग शेंडगे, अजित दुधाळ, शंकर वगरे, बाबासाहेब वाघमोडे, संभाजी आलदर, विष्णू देवकते, इंद्रकुमार भिसे, मनीषा माने, पांडुरंग यमगर, बंडू डोंबळे यांचीही यावेळी भाषणे झाली. त्यांनी भाजप सरकार व धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आड येणार्यांवर टीकेची झोड उठविली. या मेळाव्याला आमदार रामभाऊ वडकुते, रमेश शेंडगे, सुरेश शेंडगे, आर. एस. चोपडे, पांडुरंग रुपनर, अण्णासाहेब बावचकर, श्रावण वाक्षे, विष्णू देवकते, शशिकांत रेगे, नाना पाटील यांच्यासह धनगर समाजाचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment