Friday, October 5, 2018

थेट निवडून आलेल्या सरपंचालाही मताधिकार


उच्च न्यायालयाचा निर्वाळा
जत,(प्रतिनिधी)-
उपसरपंचाच्या  निवडणुकीत थेट निवडून आलेल्या सरपंचाला सदस्य म्हूणन  मत  देण्याचा आणि समान मते पडल्यास दुसरे मत देण्याचा अधिकार आहे असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी हा निर्वाळा देताना कोल्हापूर जिल्हा शिरोळ तालुक्यातील अब्दूलाट ग्रामपंचायतीची उपसरपंच  निवडणूक रद्द करून पुन्हा नव्याने घेण्याचे आदेश दिले. या बातमीला अनेक वृत्तपत्रांनी ठळक प्रसिद्धी दिली आहे.
 ग्रामविकास मंत्रालयाच्या आदेशानुसार थेट सरपंच म्हणून निवडून आलेल्या सरपंचाला उपसरपंचाच्या निवडणुकीत सदस्य म्हणून मतदान करण्यास मनाई करण्यात आली. या निर्णयामुळे शिरोळ तालुक्यातील अब्दूलाट ग्रामपंचायतीच्या  उपसरपंच पदाच्या निवडणुकीत  कल्लपा  कुमटोळे यांना एक मताने पराभव पत्करावा लागला. सरकारच्या या निर्णयाविरोधात सरपंच पांडुरंग मोरे आणि कल्लपा  कुमटोळे यांच्यावतीने अॅड धैर्यशील सुतार यांनी उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली.
त्या याचिकेवर न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी अॅड. धैर्यशील सुतार यांनी, थेट सरपंच म्हणून निवडून आलेली  व्यक्ती ही ग्रामपंचायत सदस्य असल्याने  तिला उपसरपंपदाच्या निवडणुकीत सदस्य म्हणून मतदान करण्याचा अधिकार असल्याकउे न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच या निवडणुकीत समान मते पडल्यास निर्णायक म्हणून दुसरे मत देण्याचा अधिकार सरपंचाला आहे, असा दावा केला हा दावा न्यायालयाने यापूर्वी न्यायालयाच्या निर्णयानुसार मान्य करून सरपंच पदाची निवडणूक रद्द नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश दिले.

No comments:

Post a Comment