Sunday, October 14, 2018

सरकार विरोधात धनगर समाजाने एकत्र यावे: प्रकाश व्हनमाने


जत,(प्रतिनिधी)-
राज्य सरकारने महाराष्ट्रातील धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून 2014 मध्ये महाराष्ट्राची सत्ता काबीज केली आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देवू असे सांगितले,पण चार वर्षे उलटली तरी आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही. धनगर समाजाला फसवणार्या सरकारविरोधात धनगर समाजाने एकत्र यावे, असे आवाहन अहिल्यादेवी समाजप्रबोधनी मंचचे अध्यक्ष प्रकाश व्हनमाने यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाची फसवणूक केली आहे. येत्या काही दिवसांत सरकारने धनगर आरक्षणाचा मुद्दा तडीस नेला नाही तर सरकारविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल. यासाठी सर्व धनगर समाजबांधवांनी एकत्रित आले पाहिजे.  यासाठी समाजातील लोकप्रतिनिधींनी पक्ष व गट तट बाजुला ठेवुन समाज हितासाठी एकत्रित यावे आवाहन श्री. व्हनमाने यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment