Sunday, October 14, 2018

आरेवाडी दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहा: प्रकाश शेंडगे


जत,(प्रतिनिधी)-
 आरेवाडीच्या कडबनात पार पडणार्या दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करा, असे आवाहन माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी बाज (ता. जत) येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना केले.
      शेंडगे म्हणाले,यंदाचा दसरा मेळावा पुर्ण ताकदीनीशी यशस्वी करणेसाठी तमाम धनगर बांधवांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. त्यांनी यावेळी स्व.शेंडगेबापुनी केलेल्या कार्याची माहिती कार्यकर्त्यांना दिली. यंदाचा दसरा मेळावे आरेवाडीतच पण वेगवेगळ्या ठिकाणी भरणार का, असा सवाल कार्यकर्त्यांनी केला. यावेळी बोलताना शेंडगे म्हणाले, गोपीचंद पडळकरांना आमची अँलर्जी आहे. धनगर आरक्षणाविषयी आम्ही एकाच स्टेजवरती यायला तयार आहे,त्यासाठी हा प्रकाशआण्णा दहा पावले मागे घ्यायला तयार आहे,पण दसरा मेळाव्याचा मुख्य हेतु आणि उद्देश जर बाजुला जावुन त्याला राजकीय रागरंग येत असेल तर ते आपण कदापी खपवुन घेणार नाही. या मेळाव्याला सामाजिक कार्य व धनगर आरक्षणासाठी ज्यांनी रात्रीचा दिवस केला आहे अशा दिग्गज व ज्ञानी मंडळींनी आपण दसरा मेळाव्यासाठी पाचारण केले आहे. केवळ पुजाअर्चा आणि पणत्या प्रज्वलन व महायज्ञाचा ड्रामा करुन धनगर आरक्षणाचा लढा यशस्वी होत नसलेचा टोलाही त्यांनी पडळकरांचे नाव न घेता लगाविला.यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य महादेव पाटील,भाजपाचे नेते शंकरराव वगरे,माजी जि..सदस्य कुंडलिक दुधाळ, बंडुपंत डोंबाळे, श्री. बाचकर, तम्मन्ना गडदे,माजी सरपंच संजय गडदे,राजु मिसाळ,कल्लाप्पा कोळी,धनाजी गडदे विष्णु खरात आदी  मंडळी उपस्थित होती.
        दरम्यान,जि..सदस्य महादेव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि,आरेवाडीच्या बनात एकंच दसरा मेळावा भरावा,दोन दोन मेळावे एकाच समाजाचे व एकाच लढ्यासाठी होत असेल समाजात एकी राहणार नाही व तळागाळातील समाजात संभ्रमावस्था निर्माण होईल,त्यासाठी पडळकर आणि प्रकाशआण्णा शेंडगे यांनी समन्वय साधावा असे बोलुन ते म्हणाले की जर दोन मेळावे होत असतील तर आम्ही कुणाच्याच मेळाव्याला येणार नसलेचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
      बंडोपंत डोंबाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की दसरा मेळाव्याची पुर्व संकल्पना आणि मेळाव्याच्या निर्मितीचा मी साक्षीदार असुन दसरा मेळाव्याचा हेतु आणि उद्देश काय होता आणि दसरा मेळावा हे आता स्वत:ची राजकीय भुक भागवण्यासाठी समाजाला वेठीस धरणारी आहे. दसरा मेळाव्याचा मुख्य हेतु हा असा होता की,समाजातील गोरगरीब वंचितांना नोकरीच्या संधीसाठी क्लास उभा करणे,दानपेटी तयार करुन त्या दानपेटीतील रक्कम गोरगरीबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी,दवापाण्यासाठी वापर करायचा,मोठे इस्पितळ निर्माण करुन धनगर समाजातील मोठमोठ्या डाँक्टरांना पाचारण करुन गरजुगरीब रुग्णावरती इलाज करणे,शिक्षणाची दारे खुली करणे आणि धनगर आरक्षण तडीस नेणे असे असताना गत तीन वर्षात एकही साध्य झाले नाही. आपला राजकीय इस्कोट झाला की,  समाजाला वेठीस धरत आरक्षणाच्या नावाखाली स्टंटबाजी करायची हा उद्योग आपणास मान्य नसलेने आम्ही प्रकाशआण्णा शेंडगे यांच्या नेत्रत्वाखालील दसरा मेळाव्याला संबोधित करत असलेचे मत डोंबाळे यांनी व्यक्त केले.
      यावेळी भाजपाचे नेते शंकरराव वगरे  बोलताना म्हणाले की,आरेवाडीचा बिरोबादेवस्थान म्हणजे कुणा एकाची राजकीय प्राँपर्टी नसुन ते महाराष्ट्र,कर्नाटक व आंध्र प्रदेशातील तमाम भाविकभक्तांचं श्रद्धास्थान आहे. समाजाच्या नावाखाली आपली राजकीय पोळी भाजुन घेण्याचा कुणीही प्रयत्न करु नये. माजी जि..सदस्य कुंडलिक दुधाळ यांनीही बोलताना बंडोपंत डोंबाळे यांच्या मनोगताला समर्थन देत आम्हीही दसरा मेळाव्याचे साक्षीदार असुन शेंडगे घराण्याचे धनगर समाजावरील उपकार विसरता येणार नाहीत. कार्यक्रमाचे स्वागत व सुत्रसंचालन माजी सरपंच संजय गडदे यांनी तर आभार तम्मा गडदे यांनी केले. या बैठकीला पंचक्रोशीतील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment