Thursday, October 18, 2018

मिरज डीएड कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा नोव्हेंबरमध्ये मेळावा

जत,(प्रतिनिधी)-
मिरज येथील श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या शेठ रतिलाल विठ्ठलदास गोसलिया ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन (डीएड) च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती प्राचार्य गौतम शिंगे माजी विद्यार्थी संघाचे संभाजी कोडग,दिलीप वाघमारे, सिद्धू कोरे यांनी दिली. अध्यापक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे नोंदणी फॉर्म भरण्याचे काम सुरू असून उर्वरित विद्यार्थ्यांनी अध्यापक विद्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
   अध्यापक विद्यालयाच्या प्रारंभापासून आतापर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा एकत्रित भव्य असा मेळावा घेण्यात येणार आहे. माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय या निमित्ताने स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे . या स्मरणिकेसाठी अध्यापक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी 'आपण कसे घडलो' व 'अध्यापक विद्यालयातील आलेले अनुभव' तसेच स्वंररचित कविता, दोनशे शब्दांपर्यंतच्या कथा अशा प्रकारचे लेख अध्यापक विद्यालयात प्रत्यक्षात अथवा खालील दिलेल्या ई-मेल फोटो व सध्याच्या  पत्त्यावर पाठवावे.
संपर्क कार्यालय (०२३३) २२११५२९,प्राचार्य  जी.टी. शिंगे ९९२२६२९८८४
srvgdtedcollegemiraj@yahoo.com

No comments:

Post a Comment