Sunday, October 14, 2018

तणावमुक्त जीवनाचा आनंद


वय वाढत चाललय, हे स्विकारलं तरच, आपण तणावमुक्त जीवनाचा आनंद मनमुराद लुटू शकतो. प्रत्येक वयोमान वेगवेगळ्या वाटेवर सप्तरंगी जीवन घेऊन येतं. त्याचा आपण आनंद घ्यायचा असतो. केस काळे करायचेत? तर, केस काळे करा वजन कमी करायचय? ते पण करा. मनपसंत कपडे घालायचेत? खुशाल घाला. लहान मुलांसारख्या उड्या मारावाश्या वाटतात? मारा उड्या. आरशात पाहून आपल्या आहे त्या अस्तित्वाचा स्वीकार करायला शिका. कोणतही क्रिम किंवा फेसपॅक तुम्हाला गोरे करणार नाही. कोणताही शॅम्पू केस गळती रोखू शकणार नाही. कोणतेही तेल टकलावर केस उगवू शकणार नाही. कोणताही साबण बच्चों जैसी कोमल स्कीन देणार नाही. मग तो प्रॉक्टर गँम्बल असो की पतंजलि. हे सगळं नैसर्गिक असतं. वयोमानाप्रमाणे शरीरात बदल होत जातात. जुन्या मशीनला मेन्टेनन्स करून अपटुडेट करू शकतो . पण नवीन नाही करू शकत. कोणत्याही टुथ-पेस्टमध्ये नमक नसतं व कोणत्याही टूथ-पेस्ट मध्ये निम नसतो. पोट सुटलंय सुटू दे, त्यासाठी लाज वाटू नये, आपलं शरीर वयोमानानुसार बदलत राहतं. वजन पण त्या प्रमाणे कमी जास्त होत राहतं. इन्टरनेट, सोशल मिडीयावर वेगवेगळ्या उपदेशांनी उच्छाद मांडलाय. ‘अमुक खा, तमुक खा, गरम खा. थंड प्या, हे पिऊ नका, हे खाऊ नका, कपाल भाती, सकाळी लिंबूपाणी, गाईचं दूध, जोरात श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या, डाव्या कुशीवर झोपा, उजव्या कुशीवरून उठा, हिरव्या पालेभाज्या खा, डाळीत प्रोटीन असतात, नाचणी खा, वगैरे वगैरे.... वरील सारे उपदेश वाचले तर, अस वाटतं, आयुष्य बेकार आहे. धड काही खावू शकणार नाही. धड जगू शकणार नाही आणि मानसिक तणावाखाली डिप्रेशनची भर पडेल ती वेगळी... उत्पादक कंपन्या डोक्याचा भुगा करतात. यांचे महागडे खाणे खाण्यापेक्षा मानसिक तणावच जास्त होतो. अरे आपण एकदा कधीतरी मरणारच आहोत ना? नशिब अजून बाजारात अमृत विकायला नाही आलं. मजेत रहा, पाहिजे ते, जमेल तसं खात रहा, व्यायाम करा आनंदात रहा, शरीराला त्याच कार्य करू द्या, मन मारून जगू नका, कामात व्यस्त रहा, समवयस्क, जुन्या बालमित्रांशी संपर्कात रहा. निसर्गाच्या सानिध्यात रहा.
 *****
आयुष्यात फक्त दोनच गोष्टीमुळे तुम्ही ओळखले जाता...! एक म्हणजे... तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेलासंयम‘....! आणि दुसरे म्हणजे... तुमच्याकडे सर्वकाही असताना तुमच्याकडे असलेलीनम्रता‘..!
 *****
आयुष्यात कुणाची पारख करताना, त्याच्या रंगावरून न करता, उलट त्याच्या मनावरून करा... कारण... पांढर्या रंगावर जर जगाचा विश्वास असता, तर मिठाने सुद्धा जखमा भरल्या असत्या...
 *****
मास्तर : अशी कोणती बाई आहे, तिला 100 टक्के माहीत असतं की आपला नवरा कुठं आहे ?
गण्या डोकं खाजवतं.....विधवा बाई...!! मास्तर जीव देऊन मेला....No comments:

Post a Comment