Tuesday, October 2, 2018

बसरगी येथे ग्रामस्वच्छता मोहीम उत्साहात


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील बसरगी येथे ग्रामपंचायत आणि  माणुसकी फौंडेशनच्यावतीने महात्मा गांधी यांची  जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या निमित्ताने संपूर्ण गावात शाळकरी विद्यार्थी, पदाधिकारी,सदस्य आणि ग्रामस्थ यांच्यावतीने  ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले.
     प्रारंभी ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी गांधी आणि देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री या दोन महान व्यक्तींविषय माहिती सांगण्यात आली. तसेच ग्रामस्थांना आणि मुलांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राहावी यासाठी विद्यार्थी व ग्रामस्थांच्या वतीने गावातील प्रमुख रस्ते व चौक, बस स्टँड परिसरामध्ये स्वच्छता मोहीम  राबविण्यात आली.
      सरपंच सौ. इंदुमती पाटील, उपसरपंच किशोर बामणे, पंचायत समिती सदस्या सौ. सुशीला तांवशी , शेतकरी सोसायटीचे अध्यक्ष शिवाप्पा तांवशी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि गावातील समाजसेवी संस्था, युवक-युवती, प्राथमिक व विद्यालयातील शिक्षक , विद्यार्थी यांनी यावेळी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन अभिनव उपक्रम साजरा केला.

No comments:

Post a Comment