Sunday, October 14, 2018

कोसारी साठवण तलावात म्हैसाळचे पाणी सोडा: नानासाहेब भोसले


जत,(प्रतिनिधी)-
कोसारी व परिसरातील पशुधन वाचवण्यासाठी कोसारी साठवण तलाव क्र - 2 मध्ये  म्हैसाळ कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे सांगली जिल्हासंघटक नानासाहेब भोसले यांनी जतचे तहसीलदार सचिन पाटील व पंचायत समिती सभापती शिवाजी शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
जत तालुक्यातील उत्तर भागातील पाण्याची परिस्थिती अतिशय गंभीर असून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. खरिप हंगाम पावसाअभावी वाया गेला. रब्बीदेखील जाण्याच्या मार्गावर आहे. द्राक्ष आणि डाळिंब बागा आणि रब्बीचा हंगाम वाचवायचा असेल आणि जनावरांना जीवदान द्यायचे असेल तर कोसारी तलावात कृष्णेचे पाणी सोडल्याशिवाय गत्यंतर नाही.
या भागातील पशुधन धोक्यात आले असून त्याची गंभीर दखल घेऊन कोसारी साठवण तलावात म्हैसाळचे पाणी सोडले तर पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो व अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकर्यांना दिलासा मिळेल त्यासाठी म्हैसाळचे पाणी कोसारी तलावात सोडावे, अशी मागणी भोसले यांनी केली.

No comments:

Post a Comment