Wednesday, October 10, 2018

भारनियमनाविरोधात राष्ट्रवादी छेडणार राज्यभर आंदोलन

अहमदनगर,(प्रतिनिधी)-
 पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती आणि त्यातच महावितरणने सुरू केलेले भारनियमन यामुळे शेतकर्यांसह सामान्य जनता हैराण झाली आहे. भारनियमनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर आंदोलन छेडणार असल्याची माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
 दुष्काळसदृश परिस्थिती, महागाई, इंधनाची झालेली वाढ यामुळे नागरिक आधीच मेटाकुटीस आलेले असताना आता भारनियमनाची भर पडली. सरकारने याबाबत फेरविचार करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा, उद्या (शुक्रवारी) पासून राज्यभर भारनियमनाविरोधात आंदोलन छेडले जाईल, असे सांगितले. याच आंदोलनादरम्यान सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्यावतीने कंदील मोर्चाही काढण्यात येणार आहे.
राज्यात पावसाअभावी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकार मात्र त्याकडे फारसे गांभीर्याने पाहत नाही. खरीप हंगाम हातून गेला. रब्बी हंगामाचीही पुरती वाट लागली. अशा परिस्थितीत बळीराजाला मदतीची गरज आहे. परंतु सरकारला त्याचे कोणतेही गांभीर्य नाही, असे सांगून पवार यांनी, सरकारने प्रतिहेक्टर 50 हजार रुपये मदत शेतकर्याला दिली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.

No comments:

Post a Comment