Monday, October 22, 2018

जिल्हा परिषदेचा शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान


जत,(प्रतिनिधी)-
 जिल्हा परिषदेने यशवंत पंचायतराज अभियान 2016- 17 मध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल शुक्रवारी दि. 26 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचा सन्मान होणार आहे. त्यासाठी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकारी जाणार आहेत, जि.. सीईओ अभिजित राऊत यांनी ही माहीती दिली. पंचायत राज संस्थांचे व्यवस्थापन व विकास क  ा य ार्  त उत्कृष्ठ काम करणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचयतीसाठी विभागासाठी राज्यस्तरावर यशवंत पंचायतराज योजना राबवण्यात येत आहे. एप्रिल महिन्यात राज्यस्तरीय समितीने सांगली जिल्ह्याची पाहणी केली. जिल्हा परिषदेने 2016 - 17 या वर्षात केलेले उत्कृष्ट काम असल्याचे निकालानंतर शिक्कामोर्तब झाले. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामपंचायत विभाग, स्वच्छ भारत अभियान यासह जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांची पाहणी करण्यात आली होती. गुणांपैकी जिल्हा परिषदेस गुण मिळाल्याने राज्यात बाजी मारली. पंचायतराज अभियानाचे बक्षीस वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याहस्ते होईल. त्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देशमुख, उपाध्यक्ष बाबर, सभापती डॉ. सुषमा नायकवडी, अरुण राजमाने, तमनगौडा रवि-पाटील, ब्रम्हदेव पडळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अतिरिक्त सीईओ विक्रांत बगाडे यांच्यासह अधिकारी जाणार आहेत.

No comments:

Post a Comment