Tuesday, October 16, 2018

अनैतिक संबंधातून संखला तरुणाचा खून


जत,(प्रतिनिधी)-
अनैतिक संबंतातून जत तालुक्यातील सिद्धगोंडा परगोंडा बिराजदार (वय 25, रासंखया तरुणाचा धारदार शस्त्राने निघृण खून झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली आहेयाप्रकरणी संशयीत आरोपीला अवघ्या दोन तासात अटक करण्यात उमदी पोलिसांना यश आले आहे.अटक करण्यात आलेल्या संशयीताचे भरमाप्पा बिराप्पा करजगी असे आहे.
याबाबत घटनास्थळ आणि उमदी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत सिद्धगोंडा याचे शेजारीच राहणार्या भरमाप्पाच्या पत्नीशी गेल्या पाच वर्षांपासून अनैतिक होतेवारंवार स्वतभरमाप्पा आणि लोकांच्या मध्यस्थीने सिद्धगोंडाला सांगूनही त्याने त्याच्या पत्नीशी असलेले संबंध तोडले नाहीतयावरून दोघांत अनेकदा वादावादीही झाली आहेउलट आरोपीस अनेक मार्गाने त्रास देत होतात्यामुळे तो वैतागलेला होतात्यातच त्याची पत्नीही त्याच्यासोबत राहत नव्हतीती माहेरी राहत होतीयाचा राग धर्माप्पाच्या मनात होता.
काल रात्री नवरात्र उत्सवानिमित्त गावात कन्नड नाटक होतेते पाहून मंगळवारी पहाटे सिद्धगोंडा हा संख मध्यम प्रकल्पाजवळ असलेल्या आपल्या घरी आलाजुन्या घरात वडीलभाऊ झोपलेले होतेत्यांना पहाटे न उठवता तो शेजारी बांधकाम सुरू असलेल्या खोलीत झोपलाया घराला अद्याप दारे-खिडक्या लावण्यात आलेले नाहीतपहाटे तो झोपी गेल्यावर त्याच्यावर पाळत ठेवून भरमाप्पाने धारदार शस्त्राने मानेवर वार करून खून केलासिद्धगोंडा हा गाढ झोपेत असल्याने त्याला प्रतिकार करता आला नसावाअसे पोलिसांकडून सांगण्यात आलेसकाळी सिद्धगोंडा यांच्या वडिलांना आपल्या मुलाचा खून झाल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी अधिक चौकशी करता त्यांना भरमाप्पावर संशय आलाभरमाप्पाने यापूर्वी सिद्धगोंडाच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली होतीत्यामुळे उमदीच्या पोलिस पथकाने तातडीने त्याचा तपास सुरू केलातो अवघ्या दोन तासात सापडलासंशयीत आरोपी भरमाप्पास सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे व पोलिस उपनिरीक्षक प्रवीण सपांगे यांनी ताब्यात घेऊन अधिक तपास सुरू केला आहे.दरम्यानभरमाप्पाने आपणच खून केला असल्याची कबुली दिली आहेघटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी शर्मिष्ठा वालावलकर यांनी भेट दिली व पुढील तपासाचे आदेश दिले.No comments:

Post a Comment