Thursday, October 18, 2018

राज्य उत्पादन शुल्कच्या सर्व सेवा आता ऑनलाइन

जत,(प्रतिनिधी)-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या १४ सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. त्या विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून  राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेशानुसार परवाना, अनुज्ञप्ती प्रदान करण्याबाबतची अधिसूचना निर्गमित केली आहे. त्यानुसार सद्य:स्थितीत १४ सेवा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. या सेवा संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सेवांचे ऑफलाईन अर्ज या कार्यालयात स्वीकारले जाणार नाहीत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ऑनलाइन सेवांचा तपशील असा : तात्पुरती एकदिवसीय क्लब अनुज्ञप्ती जागेची नोंदणी, तात्पुरती एकदिवसीय क्लब अनुज्ञप्ती (आयात केलेले पेय, विदेशी मद्य आणि भारतीय बनावटीचे पेय, विदेशी मद्याच्या विक्रीसाठी, ज्यावर विशिष्ट दराने उत्पादन शुल्काचा भरणा केलेला आहे) मुंबई विदेशी मद्य नियम १९५३ अंतर्गत नमुना अर्ज ४ अनुज्ञप्ती मंजूर करणे, नमुना अर्ज एफएलडब्ल्यू ४ वाईन विक्रीसाठी अनुज्ञप्ती मंजूर करणे, नमुना अर्ज एफएल १ अनुज्ञप्ती मंजूर करणे, मुंबई विदेशी मद्य नियमांतर्गत वाईन सीमा शुल्क हद्दीतून बाहेर काढून विक्रीसाठी अर्ज एफएलडब्ल्यू १ अनुज्ञप्ती मंजूर करणे, हॉटेल आस्थापनेवर विक्रीसाठी नमुना अर्ज एफएल ३ अनुज्ञप्ती मंजूर करणे, क्बलच्या आस्थापनेवर विक्रीसाठी नमुना अर्ज एफएल ४ अनुज्ञप्ती मंजूर करणे, बिअर किंवा वाईन अथवा दोन्हींची सीलबंद स्वरुपातील विक्रीकरिता नमुना अर्ज एफएल/बीआर२ अनुज्ञप्ती मंजूर करणे. विशेष परवाना आणि अनुज्ञप्ती नियमांतर्गत सौम्य मद्य, वाईन किंवा दोन्हींची खुली आणि सीलबंद स्वरुपात हॉटेल, कॅन्टीन, क्लबच्या आस्थापनेवर विक्रीसाठी नमुना अर्ज ई अनुज्ञप्ती मंजूर करणे, वाईनच्या सीलबंद विक्रीकरिता नमुना अर्ज क्रमांक एफएलडब्ल्यू २ अनुज्ञप्ती मंजूर करणे, मुंबई विदेशी मद्य नियमांतर्गत राज्यात देशी मद्याची खरेदी, बाळगणे, वाहतूक आणि पिण्याकरीता एकदिवसीय नमुना अर्ज सीएल- सी परवाना मंजूर करणे, राज्यात विदेशी मद्य खरेदी, बाळगणे, वाहतूक आणि पिण्याकरिता एकदिवसीय नमुना अर्ज एफएल- एफ परवाना मंजूर करणे, राज्यात विदेशी मद्य खरेदी, बाळगणे, वाहतूक आणि पिण्याकरीता वार्षिक अथवा आजीवन अर्ज एफएल- एक्ससी नमुन्यातील परवाना मंजूर करणे या परवान्यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment