Friday, October 5, 2018

उमदी येथे उद्या मोफत वैद्यकीय शिबीर


जत,(प्रतिनिधी)-
उमदी (ता. जत) येथे श्री भाऊसाहेब पीस फौंडेशन व फाटक ट्रस्ट मिरज यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉ. एन. आर. फाटक यांच्या 120 व्या जयंतीनिमित्त मोफत वैद्यकीय शिबीर आयोजित केले असून या शिबिरासाठी विविध मान्यवर व डॉक्टर उपस्थित राहणार असल्याची माहिती फौंडेशनच्या वतीने देण्यात आली.
यावेळी ते म्हणाले की, उमदी या गावात वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी या फौंडेशनचा प्रयत्न असून रविवार, दि. 7 रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी चार पर्यंत शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरासाठी उमदी येथील हनुमान मंदिराचे अध्यक्ष आमगोंङा पाटील. जिल्हा परिषद सदस्य विक्रम सावंत, माजी जिप अध्यक्ष श्रीमती रेशमाक्का होर्तीकर, लता कुल्लोळी; तसेच आर. एन. पाठक, डॉ. एस. आर. पाठक, डॉ. कुरणे, डॉ. . आर. पाठक, डॉ. श्रीकांत कुलकर्णी उपस्थित राहणार असून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भाऊसाहेब फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment