Sunday, October 14, 2018

शिक्षक सुनील सुर्यवंशी यांचा सत्कार


जत,(प्रतिनिधी)-
जत येथील लायन्स क्लबच्यावतीने साळमळगेवाडी (ता.जत) येथील शिक्षक सुनील सूर्यवंशी यांना आदर्श शिक्षक म्हणून गौरवण्यात आले. त्यानिमिताने त्यांचा सत्कार करजगी (ता. जत) जवळील बिरादारवस्ती येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेच्यावतीने करण्यात आला. उमदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांच्या हस्ते हा सत्कार झाला.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप हिंदुस्थानी यांनी केले. यावेळी राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष काटे, पुणे विभागीय सचिव प्रल्हाद हुवाळे, तुकाराम नाईक,बोर्गी केंद्रातील राजकुमार इमन्नावर ,सीताराम गौडी, भीमाशंकर शिंपी, प्रभाकर सलगार आदी उपस्थितीत होते.
यावेळी भगवान शिंदे म्हणाले की,महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवरील शाळा असल्याने अध्यापन करत असताना शिक्षकांना अडचणी येत असतात. मात्र तुमच्यामुळेच भावी पिढी घडणार असल्याने तुम्ही केलेले कष्ट कधीच वाया जात नाही. शिक्षकांना समाजात खूप मान व आदर आहे.माझ्या लहानपणीच्या शिक्षकांनी आम्हाला चांगले संस्कार केल्याने आम्ही घडलो. यावेळी एम. एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तर संदीप पाथरुट यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment