Thursday, October 4, 2018

जतला गोवर व रूबेला लसीकरण कार्यशाळा


 जत,(प्रतिनिधी)-
गोवर आणि रुबेला या आजारांमुळे अपंगत्व तसेच व्यंध्यत्व येऊ शकते, त्यामुळे हे आजारा टाळण्यासाठी पंधरा वर्षांपर्यंतच्या प्रतिबंधात्मक लसीची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात यासाठी खास लसीकरणाची मोहीम उघडली असून शंभर टक्के मुलांना ही लस मिळावी,यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ. काजल श्रीवास्तव यांनी जत आणि माडग्याळ येथे केले.
 जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण विभागाच्या वतीने जत तालुक्यातील माडग्याळ आणि जत येथे प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची गोवर,रुबेला लसीकरण मोहिमेसंदर्भात कार्यशाळा घेण्यात आली. न्यू इंग्लिश (स्कूल माडग्याळ) व बालविद्यामंदिर (जत) या ठिकाणी झालेल्या कार्यशाळेस मार्गदर्शन करताना डॉ. श्रीवास्तव बोलत होत्या. त्यांनी गोवर व रूबेला या रोगाची लक्षणे व प्रतिबंधाविषयी मार्गदर्शन केले.यावेळी डॉ. रवींद्र आरळी यांनीदेखील मार्गदर्शन केले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी बी.एन. जगधने यांनी केले. आभार आर.डी. शिंदे यांनी मानले.

No comments:

Post a Comment