Wednesday, October 3, 2018

जत शहरात स्वच्छता मोहीम


जत,(प्रतिनिधी)-
 महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते यांच्याकडून जत शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेचे प्रतिमेचे पूजन करून साफसफाईला प्रारंभ करण्यात आला. यावेळी शहरातील मुख्य बाजार पेठेतील मंगळवार पेठ, बनाळी चौक, महाराणा प्रताप चौक, अजिंक्य चौक, निगडी कॉर्नर, सातारा रोड इथेपर्यंत झाडलोट करण्यात आली. यावेळी साफसफाई करताना डॉ. रवींद्र आरळी, युवा नगरसेविका जयश्री मोटे, नगरसेविका शिंदे, नगरसेवक उमेश सावंत, नगरसेवक विजय ताड, नगरसेवक प्रमोद हिरवे, नगरसेवक प्रकाश माने, संतोष मोटे, अण्णा देवकर, समाजसेवक डॉ. प्रवीण वाघमोडे, राजू यादव, तम्मा सगरे, ॅड. श्रीपाद आष्टेकर,युवा मोर्चा तालुकायक्ष अण्णा भिसे, बसवराज चव्हाण, कल्लाप्पा पाचंगे, किरण शिंदे, लक्ष्मण भिसे, इराण्णा भिसे, दिगंबर निकम, अशोक स्वामी, महेश कुकड़े, अनिकेत माने आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment