Monday, October 1, 2018

आठ दिवसांत पदाधिकारी बदला; अन्यथा राजकीय भूकंप


सांगली,(प्रतिनिधी)-
 सांगली जिल्हा परिषदेचे पदाधिकारी बदलाची मागणी अलिकडे काही दिवस सातत्याने होत होती. मात्र याला वरच्या पातळीवरून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर जिल्हा परिषद सदस्यांनी बंडाचा झेंडा फडकवला. जिल्हा परिषद पदाधिकारी बदलासाठी नाराज सदस्यांनी काल अखेर अल्टिमेटल दिला. सव्वा वर्षांत बदल करण्याचा शब्द पाळा, एका पलूस-कडेगाव मतदार संघासाठी जिल्ह्यातील इतर सर्व विधानसभा व खासदार मतदार संघ अडचणीत आणू नका, असे सूचित करीत आठ दिवसांत पदाधिकारी बदलाचा निर्णय घेण्यात यावा; अन्यथा जिल्हा परिषद राजकीय भूकंप घडवू, असा इशारा शिवाजी डोंगरे, प्रमोद शेंडगे यांच्यासह भाजपच्या आठ सदस्यांनी पत्रकार बैठकीत दिला.
या प्रसंगी सामुदायिक राजीनाम्याचीही तयारीही करण्यात येत आहे, असेही सांगण्यात आले. विशेष म्हणजे चार महिला सदस्यांचे पती यावेळी उपस्थित होते. सत्ताधारी भाजप आघाडीतील महाडिक गट, घोरपडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह 19 सदस्यांनी पदाधिकारी बदलाचे लेखी पत्र दिले असून आणखी तिघांचे पत्र लवरकरच मिळेल, असा दावाही त्यांनी केला. पदाधिकारी बदलासाठी आक्रमक झालेल्या भाजप सदस्यांनी माधवनगर रोडवरील शासकीय विश्रामधाममध्ये बैठक घेतली. सदस्य डोंगरे व शेंडगे यांच्यासह सरदार पाटील, सुरेंद्र वाळवेकर, मनोज मुंडगनूर, विद्या डोंगरे, शोभा कांबळे, सुरेखा बागेळी उपस्थित होते; याशिवाय स्नेहलता जाधव, सुनीता पवार, प्राजक्ता कोरे, मंगल नामद यांचे पती उपस्थित होते. डोंगरे म्हणाले, जिल्हा परिषदेचे पदाधिकार्यांची निवड करताना सव्वा वर्षांचा कालावधी देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. पदाधिकार्यांमध्ये बदला करावा, अशी मागणी करीत आहे.

No comments:

Post a Comment