Tuesday, October 16, 2018

दुर्गा अष्टमी


महिषासुरनिर्णाशविद्याचि वरदे नमः । रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि॥’ 
महिषासुराच्या संपूर्णतेचा उच्छेद करणार्या आणि वर देणार्या देवी, तुला माझा नमस्कार असो. शारदीय नवरात्र बंगालप्रांतीपूजापर्वया नावाने प्रचलित आहे. सांप्रत त्याला समाजोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दुर्गापूजा म्हणजेच आनंदाची पर्वणी. राजा कामाक्षनारायण याने अकबर बादशाहाच्या वेळी हा उत्सव बंगाल प्रांती प्रचारात आणलेला आहे. बंगालमध्ये, प्रतिपदादी कल्पाप्रमाणे प्रथम दिवशी केशसंभार अर्पण करणे, द्वितीयेला केशबंधधारण करणे, तृतीयेला देवीच्या पायांना अळिता लावणे व शेंदूर भरून आरसा दाखवणे, चतुर्थीला मधुपर्काने पूजा व डोळ्यांत काजळ घालणे. पंचमीला अंगाला चंदन लावणे, षष्ठीला रात्री देवीला जागृत करणे, सप्तमीला दोन फळे असलेली फांदी तिच्या शेजारी उभी करतात. यालाच देवीचे महालक्ष्मी स्वरूप म्हणून बिल्वफळ अर्पण करतात. अष्टमीच्या दिवशी देवीची पूजा दोन वेळा करायची असून, त्यात सकाळी नित्यपूजा आणि दुसरी अष्टमी आणि नवमी यांच्या संधिकाळी करतात. यालाच संधी पूजा म्हणतात. अष्टमीला पशुबळी, रात्री जागर आणि कुमारिकांचे पूजन आदी विधि आहेत. महाअष्टमी हा दिवस दुर्गापूजेमधील महत्त्वाचा दिवस असून, आज पूजेची सुरुवात महाआसन व षोडशोपचार पूजेपासून होते. अष्टमीला नऊ छोट्या मातीच्या घड्यांना देवीच्या नऊ शक्तिरूपाचे चिन्ह मानून, त्या नऊ छोट्या घड्यांची पूजा करतात. वयाच्या 2 वर्षांपासून ते अविवाहित मुलींपर्यंत देवीची रूपे मानून अष्टमीला कुमारिका पूजन केले जाते. तसे पाहिले तर नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी कुमारिका पूजन करतात; परंतु अष्टमी व नवमी या दोन्ही दिवशी कुमारिका पूजन मोठ्या प्रमाणावर केले जाते. ‘कुमारिका पूजननवरात्रीच्या प्रत्येक दिवशी करतात. कुमारिका हे देवीचे रूप मानून, त्यांच्यासाठी पंचपक्वाने करून, त्यांना भेटवस्तू दिल्या जातात. सर्वसाधारणपणे नऊ कुमारिकांचे पूजन अवश्य करणे, हे महत्त्वाचे ठरते. टाळ आणि नाच-गाणे यासोबत आरती पूर्ण करतात. पारंपरिक आरतीने उत्सवामध्ये चैतन्य प्राप्त होते. अशा पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये अष्टमी साजरी होते.

देवीचा जोगवा
द्वैत सारूनि माळ मी घालीन । हाती बोधाचा झेंडा मी घेईन । भेदरहित वारीस जाईन । (संत एकनाथांचा जोगवा)
 जोगवा मागणे हा एक प्रकारे देवीची उपासना करण्याचा एक प्रकार आहे. नवरात्राच्या काळात जोगवा मागण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी देवीचा कुलधर्म म्हणूनहीजोगवामागितला जातो. मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा नवरात्रात जोगवा मागितला जातो. जोगवा म्हणजे देवीच्या नावाने इतरांच्या घरी जाऊन कोरड्या धान्याची भिक्षा मागायची व मिळालेल्या धान्यांचा स्वयंपाक करून भोजन करायचे असते. ‘अहंकाराचे विसर्जन करावेअसा या मागचा हेतू असावा, असे वाटते किंवाअभिमान’, ‘तोरानष्ट करण्यासाठी जोगवा मागतात. हे उपासक गळ्यामध्ये कवड्यांची माळ घालतात. हातात वेताची परडी त्यातबाणठेवून त्यात देवी ठेवून जोगवा मागतात.

No comments:

Post a Comment