Saturday, October 20, 2018

शासकीय कार्यालयातील कर्मचार्‍यांची मतदार नोंदणी अनिवार्य


जत,(प्रतिनिधी)-
आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदार नोंदणी मोहिम अत्यंत महत्वाची असून शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांची नांवे मतदार यादीत समाविष्ट असणे अनिवार्य आहे. कोल्हापूर जिल्ह्यात याबाबत कठोर पावले उचलण्यात आले आहेत. तेथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले यांनी कडक पावले उचलत   ज्या अधिकारी व  कर्मचारी यांनी आपले नांव मतदार यादीत समाविष्ट केलेले नाही, अशा संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन देयक जिल्हा कोषागार शाखा यांच्याकडून पारित केली जाणार नाहीत, असा इशारा दिला आहे.
राज्यात आणि कोल्हापूर जिल्हयात छायाचित्र मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम गतीने राबविण्यात येत असून 31 ऑक्टोबर पर्यंत जिल्हयातील मतदार मदत केंद्रावर (संबंधित तालुक्यातील निवडणूक शाखा) किंवा संबंधित मतदान केंद्राचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे दावे व हरकती स्विकारण्यात येत आहेत. भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीत नांव नोंदणीसाठी पात्र तथापि अद्यापही मतदार यादीत नांव समाविष्ट नसलेल्या सर्व पात्र नागरिकांची नोंदणी करण्यात येत आहे. जिल्हयातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयाच्या आधिनस्त कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांची नांवे मतदार यादीत समाविष्ट असणे अनिवार्य आहे. यासाठी शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व  कर्मचारी यांची नांवे मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत अगर कसे याबाबतची माहिती संकलित करणे. संबंधित अधिकारी व कमर् चारी यांनी सादर केलेला नमुना क्रमांक 06 (कागदपत्रासह) संबंधित तालुक्यातील तहसिल कार्यालयास (निवडणूक शाखा) किंवा संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment