Saturday, October 20, 2018

आजपासून लाळ-खुरकत लसीकरण कार्यक्रम


जत,(प्रतिनिधी)-
 आज रविवार पासून जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत लाळ-खुरकत प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा पशुसंवर्धन सभापती सुहास बाबर, जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त डॉ. संजय धकाते व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजयकुमार सावंत यांनी सांगली येथे बोलताना केले.
 सुहास बाबर म्हणाले, आज रविवार दि. 21 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत लाळखुरकत प्रतिबंधात्मक शिबिराचे आयोजन जिल्ह्यात करण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण 8 लाख 34 हजार 180 जनावर आहेत. त्यापैकी 1 लाख 66 हजार545 लहान, तर 6 लाख 67 हजार 635 मोठी जनावरे आहेत. डॉ. सावंत म्हणाले, जनावरांना लाळ- खुरकत हा संसर्गजन्य विषाणूंपासून जनावरांना होणार रोग आहे, मात्र यावर वेळेत प्रतिबंधक लसीकरण केल्यास कोणताही धोका निर्माण होत नाही, त्यामुळे शेतकर्यांनी घाबरून न जाता लसीकरण मोहीम शिबिरात जनावरांना लस टोचून घ्यावी.

No comments:

Post a Comment